एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Heena Panchal : ग्लॅमरस हिना पांचाळ... नेमकी आहे तरी कोण? नाशिकमधील रेव्ह पार्टीतून अटकेनंतर चर्चेत
(Photo: @theofficialheena instagram)
1/8

मराठी बिग बॉसची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री हिना पांचाळच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी हिना पांचाळसह 22 जणांना अटक केली आहे. (Photo: @theofficialheena instagram)
2/8

यात परदेशी महिलेसह बारा महिला आणि दहा पुरुषांचा समावेश आहे. या सगळ्यांच्या रक्ताचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणी ड्रग्स आणि इतर पदार्थांचं सेवन केलं होतं ते स्पष्ट होईल. (Photo: @theofficialheena instagram)
3/8

नाशिक पोलिसांनी इगतपुरीमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर रविवारी (27 जून) पहाटे छापा टाकत एकूण 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह दक्षिण आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील काहींचा समावेश आहे. (Photo: @theofficialheena instagram)
4/8

रविवारी पहाटे नाशिक ग्रामीण पोलिसांना याबाबत टिप मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पथकासह इथे छापा टाकला. यावेळी काही महिला आणि पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत इथे आढळून आले. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी अनेकांनी साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम केलंय, काही जण कोरिओग्राफर आहेत तर एक महिला ही परदेशी नागरिक आहे. (Photo: @theofficialheena instagram)
5/8

या कारवाईत अभिनेत्री हिना पांचाळला देखील अटक केली आहे. हिनानं हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. (Photo: @theofficialheena instagram)
6/8

ती आपल्या 'बलम बंबई' आणि 'बेवड़ा बेवड़ा जालो मी टाइट' या आयटम सॉन्गसाठी प्रसिद्ध आहे. (Photo: @theofficialheena instagram)
7/8

सोबतच तिनं 2019 साली बिग बॉस मराठीमध्ये देखील सहभाग घेतला होता. (Photo: @theofficialheena instagram)
8/8

फेब्रुवारी 2020 मध्ये तिनं डेटिंग रियालिटी टीव्ही सीरीज 'मुझसे शादी करोगे' मध्ये देखील सहभागी झाली होती. (Photo: @theofficialheena instagram)
Published at : 28 Jun 2021 10:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















