एक्स्प्लोर
Advertisement
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, गोदावरीला पूर
नाशिक: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळं नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यांच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज नाशिकमधील धरणांमधून गंगापूर धरणातून 3647 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर दारणातून 11688, आणि नांदुर मध्यमेश्वरमधून 10925 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकमधील गोदापात्र तुडुंब भरुन वाहत आहे.
दरम्यान, येत्या 24 तासात कोकण किनारपट्टी लगतही मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबईतही पावसानं कालपासून जोरदार हजेरी लावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बीड
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement