एक्स्प्लोर
Advertisement
सतीश चिखलीकर लाचप्रकरणाची मूळ फाईल कोर्टातून गायब
सतीश चिखलीकर लाचप्रकरणातील खटल्याची मूळ तक्रार फाईलच जिल्हा सत्र न्यायालयातून संशयास्पदरित्या गहाळ झाली आहे.
नाशिक: नाशिकसह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या सतीश चिखलीकर लाचखोरी प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे.
चिखलीकर लाचप्रकरणातील खटल्याची मूळ तक्रार फाईलच जिल्हा सत्र न्यायालयातून संशयास्पदरित्या गहाळ झाली आहे. त्याजागी कोणत्याही साक्षीदार किंवा तक्रारदाराची सही नसलेली बनावट तक्रार कागदपात्रांमध्ये दाखल झाली आहे. त्यातील काही मजकूरही बदलल्याचं समोर आलं आहे.
याप्रकरणाची जिल्हा न्यायालयानेही गंभीर दखल घेतली असून, सरकारवाडा पोलिस ठाण्यात न्यायालयाकडून निबंधकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते, त्यावेळी 2 मे 2013 रोजी एका तक्रारदाराकडून 22 हजारांची लाच स्वीकरतांना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली होती.
त्यावेळी तपासात चिखलीकरकडे दागिने आणि रोकड अशी सुमारे 17 कोटींची मालमत्ता मिळाली होती. तसेच राज्यभरात त्याची जवळपास 78 ठिकाणी मालमत्ता आढळून आली होती.
याप्रकरणात आरोपपत्र देखील दाखल होऊन चिखलीकरची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. मात्र या खटल्यातील मूळ तक्रार फाईलच संशयास्पदरित्या गायब झाल्याने, आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलीस आता पुढील तपास कसा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाचं म्हणजे मूळ तक्रारच गायब झाल्याप्रकरणातही पोलिसांनी सतीश चिखलीकरवरच ठपका ठेवला आहे. सरकारवाडा पोलिसांनी त्यालाच आरोपी केले असून, ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र एवढ्या गंभीर प्रकरणात प्रिंटिंग मिस्टेक कशी काय होऊ शकते हा खरा प्रश्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement