एक्स्प्लोर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय

94 वे साहित्य संमेलन 26, 27, 28 मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते.

नाशिक : 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 94 वे साहित्य संमेलन 26, 27, 28 मार्च रोजी नाशिकमध्ये पार पडणार होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं.

कोरोनामुळे साहित्य संमेलन यावर्षी घ्यायचेच नाही असं महामंडळाने ठरवलं होतं. मात्र नोव्हेंबर 2020 च्या मध्यापासून कोरोनाची लागण कमी कमी होत गेली. डिसेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आली होती.  त्यामुळे साहित्य रसिकांची मागणी लक्षात घेत साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचं संक्रमण पुन्हा वाढल्याने साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.

कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे. या आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही म्हणून कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावर नाशिकच्या स्वागतमंडळाला साहित्य महामंडळाशी चर्चा करून हे संमेलन घेता येईल असेही कौतिकराव ठाले पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र स्थगित संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यात कोणताही बदल केला जाणार नाही. हे संमेलन मे 2021 च्या आत स्वागतमंडळाने घ्यावे अशी महामंडळाची अपेक्षा आहे.

94 व्या साहित्य संमेनलानाची तयारी जोरदार सुरु होती. निधी संकलन आणि इतर तयारीला वेग आला होता. मात्र कोरोनाने डोकं वर काढलं. साहित्य महामंडळाने नाशिकमध्ये कोरोना कमी होण्याची पुरेशी वाट पाहिली, मात्र कोरोनाचा प्रसार कमी होण्याची चिन्ह दिसत नसल्याने संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. संमेलन अध्यक्ष, साहित्य संस्थाचे प्रमुख पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं.

साहित्य संमेलन स्थळावरुन नव्या वादाला सुरुवात, सरहद संस्था अन् दिल्लीचे आयोजकांचे संयुक्त निवेदन

ऑनलाईन संकल्पनेत साहित्य संमेलन बसत नाही

साहित्य संमेलन ऑनलाईन होऊ शकत नाही. ऑनलाईन संकल्पनेत साहित्य संमेलन बसत नाही, असं मला वाटतं. ऑनलाईन एखादा परिसंवाद, चर्चा, भाषण इत्यादी गोष्टी करता येतील. मात्र तिथे समुहाने येऊन आनंद घेता येणार नाही. ऑनलाईन उपक्रमांचं स्वागत करु मात्र संमेलन ऑनलाईन घेता येणार नाही, असं कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं.

यंदाचं अभा मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये; कौतिकराव ठाले पाटील यांची घोषणा, दिल्लीची संधी हुकली

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Nashik Crime: पोलीस कॉन्स्टेबलसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 10 हजारांची लाच घेणं भोवलं; लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल; नाशिक पोलीस दलात खळबळ
पोलीस कॉन्स्टेबलसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 10 हजारांची लाच घेणं भोवलं; लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल; नाशिक पोलीस दलात खळबळ
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget