एक्स्प्लोर

नाशिकमध्ये नगरसेवकांची चमकोगिरी! काहीही संबंध नसताना लसीकरणाबाबत शहरभर होर्डिंग्स

नाशिक महानगरपालिकाची निवडणूक 8 ते 9 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत नाव पोहचवण्यासाठी नगरसेवकामध्ये अक्षरशः स्पर्धा लागली आहे.

नाशिक : लसीकरणाच्या नावाखाली नाशिक शहरात नगरसेवकांची चमकोगिरी सुरू आहे. एकीकडे नागरिकांना लस उपलब्ध होत नाही तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे मोफत लसीकरणाचे अनधिकृत होर्डिंग्ज शहरभर लावले जात आहे. लोकप्रतिनिच्या चमकोगिरीमुळे शहर विद्रुपीकरणात भर पडत आहे.

नाशिक शहरात जवळपास प्रत्येक प्रभागात बहुताश नगरसेवकांनी लवलेले होर्डिंग्स नागरिकंचा मनस्ताप अधिकच वाढवत आहेत.  शासनाकडून मिळणाऱ्या लशीचे मनपा प्रशासनाकडून मोफत वितरण केले जात आहे. महापालिकेच्या केंद्रावर नागरिकांचे लसीकरण केले जाते आहे.  या शृंखलेत नगरसेवकांचा थेट सबंध कुठेच बघायला मिळत नाही. मनपाचे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण केलं जात आहे.  प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी लसीकरण केंद्राबाहेर आणि वार्डात फलकबाजी करण्यास सुरुवात केली. 

नाशिकमध्ये नगरसेवकांची चमकोगिरी! काहीही संबंध नसताना लसीकरणाबाबत शहरभर होर्डिंग्स

महापालिकेकडून मनपाच्या केंद्रावर मोफत लसीकरण पहिल्या दिवसापासून केले जात आहे. मात्र आता नगरसेवक इथेही श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिक महानगरपालिकाची निवडणूक 8 ते 9 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत स्वतःचे नाव पोहोचवण्यासाठी नगरसेवकामध्ये अक्षरशः स्पर्धा लागली आहे. सर्वच स्तरातून चमकोगिरीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. लोकांना तीन-तीन तास रांगेत उभे रहावे लागत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस उलटून गेलेत तरीही दुसरा डोस मिळत नाही. आधी लसीकरण सुरळीत करा आणि नंतर स्वतःचे मार्केटिंग करा, असा सल्ला नागरिकांनी नगरसेवकांना दिलाय. तर, केंद्र सरकारकडून येणाऱ्या लसींचा साठ्यात नगरसेवकांचे योगदान काय असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. 

नाशिकमध्ये नगरसेवकांची चमकोगिरी! काहीही संबंध नसताना लसीकरणाबाबत शहरभर होर्डिंग्स

नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनीही शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या या फलकबाजीला  चाप लावला आहे. लोकप्रतिनिधी यांनी अनधिकृत होर्डिंग्ज लावणे योग्य नाही, सुरुवातीला त्यांना होर्डिंग्ज काढण्याच्या सूचना दिल्या जातील, त्यानंतरही ऐकले नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा जाधव यांनी दिलाय. त्याच बरोबर अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सूचना दिल्यानंतर अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना दणका द्यायला सुरुवात झालीय.

या आधीही मनपा आरोग्य विभागाच्या माध्यमातून रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात होती. त्या कामातही नगरसेवक लुडबूड करत स्वतः क्रेडिट घेत होते. आता पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चमकोगिरी सुरू झाल्याने शहरात नगरसेवकांच्या  कामापेक्षा होर्डिंग्जची चर्चा अधिक होत आहे. 

नाशिक शहरातील लसीकरणाची सध्याची स्थिती

- एकूण लसीकरण- 4,94,747
- पहिला डोस- 3,77,604
- दुसरा डोस- 1, 17,143

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची सध्याची स्थिति

नाशिक शहरात सध्या 733 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्ह्यात एकूण 1779 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 8420 एवढी आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget