एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: 'जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याचीही..', बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

Chhagan Bhujbal on Baba Siddique Shot Dead : गोळ्या झाडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणावर आता राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे, त्याचबरोबर आता सत्ताधारी नेत्यांनी देखील सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Chhagan Bhujbal on Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. काल रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणावर आता राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे, त्याचबरोबर आता सत्ताधारी नेत्यांनी देखील सरकारला घरचा आहेर दिला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी याप्रकरणी भाष्य केलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आहे, असं देखील मंत्री छगन भुजबळ म्हणालेत.

काय म्हणालेत छगन भुजबळ?

नाशिकच्या येवल्यामध्ये माध्यमांशी बोलताना भुजबळांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षापासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, त्यांना सुरक्षा देऊन देखील काही होत नाही. धमक्या आल्या होत्या तर काळजी घेतली पाहिजे होती. धमकी कोणी दिली होती याचा देखील तपास करायला पाहिजे होता. ही घटना घडली त्यावेळी पोलीस काय करीत होते?, असा सवाल उपस्थित करत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.

आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मुंबई पोलिसासाठी हे एक चॅलेंज आहे. 10 ते 20 हजारात ही पोरं हत्या करत आहेत. ही कॉन्ट्रकट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिलं पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र पोलिसांचे मोठे नाव आहे. ते खराब होवु नये. लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी. गृहमंत्री काही बोलायला तयार नाहीत. पोलिसांच्या मागे गृहमंत्री, सरकार यांनी उभे राहिले पाहिजे. पोलिसांचं धैर्य वाढवलं पाहिजे. यात कुठेही राजकारण नाही. असा काही इतिहास नाही, की कोणी काँग्रेस सोडून गेल्यावर त्याची हत्या झाली. खंडणी, किंवा व्यवहार यातून ही हत्या झाली असावी. ही कॉन्ट्क्ट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिले पाहिजे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर झाला पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा मिळाली मिळाली पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे, असंही पुढे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
Embed widget