एक्स्प्लोर
नाशिकमध्ये नगरसेविकेचं मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न
ऐन लक्ष्मीपूजनच्यादिवशी चोरट्यांनी भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : नाशिकमधील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आता चेन स्नॅचर्सनी लोकप्रतिनिधींनाही सोडलेलं नाही. ऐन लक्ष्मीपूजनच्यादिवशी चोरट्यांनी भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फूटेज माझाच्या हाती लागलं आहे.
वर्षा भालेराव या नाशिकमधल्या प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका आहेत. गुरुवारी दुपारी खरेदीसाठी गेल्या असताना आलेल्या दुचाकीवरील एका चोरट्यानं वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. भालेराव यांनी तात्काळ प्रतिकार केल्यानं सोनसाखळी वाचली मात्र, गळ्यातील सोन्याचं पेंडंट लुटून नेण्यात चोर यशस्वी झाला.
या घटनेमुळे नाशकात आता सर्वसामान्य नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधीही सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement