एक्स्प्लोर
Advertisement
नाशिकमध्ये 14 वर्षीय दिव्यांग मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
वसतीगृहांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. नाशिकमध्ये 52 वर्षीय शिपायाकडून 14 वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
नाशिक : 14 वर्षीय दिव्यांग मुलीवर 52 वर्षीय शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. शासकीय अंध शाळेत केअर टेकरने मुलांना दारूच्या नशेत मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.
चॉकलेटचे आमिष दाखवून वसतीगृहामध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेले बाळू धनवटे हे पीडित मुलीवर वस्तीगृहाच्याच शौचालयात वेळोवेळी लैंगिक अत्याचार करत होते. मागील चार महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरु होता.
विशेष म्हणजे याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास चाकूने मारून टाकण्याची धमकीही या नराधमाने मुलीला दिली होती. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या काही मैत्रिणींना सांगत ऑडिओ रेकॉर्ड करून एका शिक्षिकेला सांगितला आणि शाळेसह हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली.
मुलीने काल पोलीस ठाणे गाठत तक्रार देताच शिपाई बाळू धनवटेवर बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीतूनच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
समाजातील या विशेष मुली सर्वसामान्य मुलींप्रमाणेच जगण्याचा, समाजात वावरण्याचा प्रयत्न करत असतानाच बाळू धनवटे सारखे नराधम त्यांना लक्ष्य करत आहेत. या घटनेमुळे वसतीगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement