Nashik Weather Update : नाशिकसह 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
Nashik Weather Update : पुढील तीन दिवस जळगाव, नाशिक, अहमदनगरसह काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Nashik Weather Update नाशिक : यंदा राज्यात म्हणावी तशा थंडीला सरुवात झाली नाही. त्यातच आता पुढील तीन दिवस जळगाव, नाशिक, अहमदनगरसह अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकण भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmers) चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी सकाळी नाशिकचे किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर गुरुवारी 29.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककर रात्री थंडी आणि दिवशी उन्हाळा अशी अनुभूती घेत आहेत.
तीन दिवस पावसाचा अंदाज
सध्या मध्य भारतावर दोन विविध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव होत आहे. हरियाणाच्यावर पश्चिमी प्रकोप प्रणाली आहे. हवेच्या वरच्या थरात ही प्रणाली चक्रीय वात स्थिती रूपात आहे, यासोबतच उत्तर प्रदेशाच्या नैर्ऋत्येला चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे.कर्नाटकच्या अंतभांगापासून उत्तर प्रदेशातील या चक्रीय स्थितीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्वेकडून येणारा चारा हा सोबत आर्द्रता घेऊन येत आहे. या प्रभावातून मध्य भारतावर पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवार ते रविवार या कालावधीत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
नोव्हेंबरच्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नाशिकमध्ये (Nashik Rain Update) द्राक्ष, कांद्यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.
सांगलीत थंडीमध्ये पावसाची हजेरी
सांगली शहरात रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तारांबळ उडाली. ऐन थंडीच्या कडाक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली आहे. रात्री अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पाऊस सुरु होता. या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. या पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Bus Accident : स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस आदळली झाडावर; चालक-वाहकासह 17 प्रवासी जखमी