एक्स्प्लोर

Nashik Bus Accident : स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस आदळली झाडावर; चालक-वाहकासह 17 प्रवासी जखमी

Nashik Bus Accident : देवळा शहरानजिक असलेल्या सप्तश्रृंगीनगर जवळ कळवण-मालेगाव बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक, वाहकासह बसमधील 17 प्रवासी जखमी झाले आहेत.

Nashik Bus Accident News नाशिक : नाशिक जिल्ह्यात अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी रात्री देवळा (Deola) शहरानजिक असलेल्या सप्तश्रृंगीनगर जवळ कळवण-मालेगाव बसचा (Bus Accident) अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात चालक, वाहकासह बसमधील 17 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टायर फुटलं अन् बस आदळली झाडावर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कळवण-मालेगाव ही बस (Kalwan-Malegaon Bus) गुरुवारी देवळा शहरात प्रवेश करण्यापूर्वी सप्तश्रृंगीनगराजवळ येत असताना स्टेअरिंग रॉड तुटल्याने उजव्या बाजूच्या विजेच्या खांबाला बसची धडक बसली. त्यानंतर टायर फुटले आणि बस डाव्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर आदळली. या अपघातात (Accident) एकूण 17 जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली. अपघात घडल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) प्राथमिक उपचारासाठी (Treatment) दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कळवण, मालेगाव, चांदवड, नाशिक, चांदवड आदी ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले.

अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे

पुरुषोत्तम देवबा ठाकरे - चालक (46), वाय एस महाले - वाहक (30), राहुल राजू कचवे (30), अकबर अली शहा (50), भिका रुपसिंग सोळंके (75), अरविंद गणपतराव जोंधळे (65), पांडुरंग शंकर साठे (64),  हर्षल युवराज पगार (20), कोमल विकास शिरसाठ (20), मोहम्मद मनु (25), सविता भावराव सूर्यवंशी (43), ओंकार बाबासाहेब येरुळे (20), मेहेरदिन अब्दुल गफर (34), आकाश कृष्णा गांगुर्डे (24), लखन हरी सोनवणे (40), योगिता लखन सोनवणे (35), उषाबाई पोपट थोरात (48), अशी अपघातात जखमी (Injured) झालेल्यांची नावे आहेत. 

दरम्यान, जखमींना बसमधून बाहेर काढण्यात दवाखान्यात नेण्यासाठी संभादादा मित्रमंडळ, शिवराजे मित्र मंडळ यांच्यासह इतरांनी सहकार्य केले. देवळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचीही मदत मिळाली. तहसीलदार विजय सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, ज्योती गोसावी, आगारप्रमुख संदीप बेलदार, राजेंद्र आहिरे उपस्थित होते. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Nashik Political News : नाशकात भाजपच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा?; शहराध्यक्षांचे भावी आमदार म्हणून झळकले होर्डिंग्ज

Nashik News : दुर्दैवी! नाशिकमधील 'त्या' गॅस गळतीत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू; चार दिवस मृत्यूशी झुंज अपयशी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Maharashtra Weather Update: पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Mutual Fund : शेअर बाजारातील घसरणीचा फटका, जानेवारीत म्यूच्युअल फंड्सची AUM 1.1 लाख कोटींनी घटली, SIP च्या रकमेतही घट
शेअर बाजारातील घसरणीचा म्यूच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर परिणाम, SIP च्या रकमेत घट,पाहा काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 13 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAaditya Thackeray Delhi Daura : ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावरKiran Samant On Rajan Salvi : राजन साळवी, सामंतांचा एकाच गाडीतून प्रवास,बैठकीत काय ठरलं?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 13 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Maharashtra Weather Update: पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Mutual Fund : शेअर बाजारातील घसरणीचा फटका, जानेवारीत म्यूच्युअल फंड्सची AUM 1.1 लाख कोटींनी घटली, SIP च्या रकमेतही घट
शेअर बाजारातील घसरणीचा म्यूच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर परिणाम, SIP च्या रकमेत घट,पाहा काय घडलं?
Thackeray Camp & Shinde Camp: मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिकमध्येही पक्षाला लागली गळती
ठाकरे गटाला लागली गळती, धडाधड राजीनामे पडले; राजन साळवी शिंदेंचा भगवा खांद्यावर घेणार
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
New Income Tax Bill : नवं प्राप्तिकर विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता, कर किती द्यावा लागणार? नेमकं काय बदलणार?
नवं प्राप्तिकर विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता, विधेयकात किती विभाग? नेमकं काय बदलणार?
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सराव सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सराव सामने!
Embed widget