एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Nashik News : आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नुकतेच नाशिकमध्ये दाखल झाले आहे.

Uddhav Thackeray Nashik Visit नाशिक : आगमी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन (State level convention) आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नुकतेच नाशिक विमानतळावर दाखल झाले आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे जंगी स्वागत केले आहे. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. 

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (Ayodhya Ram Mandir Inauguration) न जाता सोमवारी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) ते आज सायंकाळी श्रीरामाचे पूजन करणार आहेत. नंतर ते रामकुंडावर गंगा पूजन करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

आता उद्धव ठाकरे नाशिक विमानतळाहून भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला (Swatantra Veer Savarkar Smarak) अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. सायंकाळी पाच वाजता काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Mandir) जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच यावेळी महाआरती देखील करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता उद्धव ठाकरे गोदा आरती करणार आहेत. 

उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

दि. 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन (Shivsena UBT State Level Convention) आयोजित करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.  याच दिवशी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होईल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाहीर सभेत कुणावर तोफ डागणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

...म्हणून घेणार काळाराम मंदिराचे दर्शन

देशातील वातावरण बदलण्यासाठी सुरवात करण्यासाठी उद्या अधिवेशन घेत आहोत. जेवढे महत्त्व अयोध्येला आहे तेवढेच नाशिकच्या पंचवटीला आहे. अयोध्येत  श्री राम राजा तर येथे त्यांना त्याग, संघर्ष करावा लागला म्हणून आम्ही संघर्ष करणाऱ्या रामाच्या पंचवटीमधील काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अयोध्येत आज राजकीय इव्हेंट, ते करण्यात भाजपचा हात कुणीच धरु शकत नाही : संजय राऊत

Kalaram Mandir : काळाराम मंदिरात आकर्षक द्राक्षांची सजावट; दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: ‘रस्त्यांच्या कामात चूक दाखवा, मी नाव बदलेन’; नाशिक महापालिका आयुक्तांचे टीकाकारांना ओपन चॅलेंज
‘रस्त्यांच्या कामात चूक दाखवा, मी नाव बदलेन’; नाशिक महापालिका आयुक्तांचे टीकाकारांना ओपन चॅलेंज
Nashik Accident News: त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना गर्दीत धक्का लागला, खाली कोसळली अन् ST बसचं चाक अंगावरून गेलं; 17 वर्षीय युवतीचा मृत्यू, नाशिकमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना
त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना गर्दीत धक्का लागला, खाली कोसळली अन् ST बसचं चाक अंगावरून गेलं; 17 वर्षीय युवतीचा मृत्यू, नाशिकमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना
Nashik News: कुंभ नगरी नाशिकमध्ये नवा वाद, बीफ मार्केट-कत्तलखान्याची 'ती' 5 कोटींची निविदा महापौरांकडून रद्द, म्हणाल्या, 'नाशिकच्या पावित्र्याशी...'
कुंभ नगरी नाशिकमध्ये नवा वाद, बीफ मार्केट-कत्तलखान्याची 'ती' 5 कोटींची निविदा महापौरांकडून रद्द, म्हणाल्या, 'नाशिकच्या पावित्र्याशी...'
Sudhirdas Pujari on Raj Thackeray: गणपतीत दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर महंत सुधीरदास पुजारींचा पलटवार; म्हणाले...
गणपतीत दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर महंत सुधीरदास पुजारींचा पलटवार; म्हणाले...

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget