एक्स्प्लोर

'लसीकरण पूर्ण झालं असल्यास सरकारकडून 15 हजार मिळणार'; खोटं आश्वासन देत वृद्धांची फसवणूक, नाशिकमधील प्रकार

कोरोना विरुद्धची लस आता जाऊन कुठे सुरळीत मिळू लागली आहे. पण आता या लसीकरणासंबधी एक नवीनच घोटाळा समोर आला आहे.

नाशिक : सध्या सायबर फ्रॉडप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फसवणुकीचे गुन्हे दररोज समोर येत आहेत. त्यामुळे कोण कोणाची आणि कशाप्रकारे फसवणूक करेल हे सांगता येत नाही. आतातर लसीकरणासबंधी अगदी अजबप्रकारे फसवणूक केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशकात कोरोनाच्या नावाखाली एका भामट्याने दोन वृद्ध बहिणींना 1 लाख 12 हजार रुपयांना लुटले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकांना सरकारकडून प्रत्येकी 15 हजार रुपयांची मदत दिली जाते आहे, अशी बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी भद्रकाली परिसरात कपडे खरेदीसाठी आलेल्या दोन वृद्ध महिलांना एका व्यक्तीने रिक्षात बसवत दोन्ही लसीचे डोस झाले असल्यास सरकार 15 हजार रुपये देणार असल्याची बतावणी करत नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर घेऊन आला. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करत त्यांचे दागिने, पैशांची बॅग, एटीएम कार्ड असे सारे घेऊन तो फरार झाला. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच महिलांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत तक्रार केली. त्यानंचक पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासही सुरुवात केली आहे. 

पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी अशाप्रकारची कुठलीही सरकारची योजना नसून नागरिकांनी सतर्क रहावे आणि अशी कोणी बतावणी करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. दरम्यान सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती सरकारवाडा पोलिस ठाण्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar meet Sharad Pawar full Video : भेट घेतली, केक कापला, शरद पवार-अजित पवार भेटीचा  व्हिडीओAjit Pawar meet Shard Pawar : प्रफुल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेटSanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाहीAjit Pawar meet Sharad Pawar : भेटीत काय चर्चा झाली ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Embed widget