एक्स्प्लोर
Delhi Blast Probe: 'मोहम्मद उमर आणि तारिक ही संशयितांची नावं', UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तपासाला वेग आला असून, दोन संशयितांची नावे समोर आली आहेत. मोहम्मद उमर (Mohammed Umar) आणि तारिक (Tariq) अशी त्यांची नावे असून, स्फोटासाठी वापरलेली कार तारिकच्या नावावर असल्याचे समजते. मोहम्मद उमरने आत्मघाती हल्ला केल्याचा संशय असून, तो या स्फोटात ठार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या प्रकरणी बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायदा (UAPA), स्फोटक पदार्थ कायदा (Explosives Act) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले, 'इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन. वी कॅन नॉट शेअर इच अँड एव्हरी डिटेल.' पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाडीच्या मार्गाचा शोध सुरू केला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि इतर सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा संयुक्तपणे तपास करत आहेत.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















