एक्स्प्लोर

Sunil Tatkare on Jayant Patil : 'बहीण, भाऊनंतर लाडकी बायको योजना आणा', जयंत पाटलांचं वक्तव्य; आता सुनील तटकरेंनी डिवचलं, म्हणाले...

Sunil Tatkare on Jayant Patil : लाडकी बहीण, भाऊनंतर आता लाडकी बायको योजना आणा, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते. यावरून सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

नाशिक : लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana), भाऊनंतर आता लाडकी बायको योजना आणा, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले होते. तसेच पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना घेणे, हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असेही त्यांनी म्हटले. यावरून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे. 

सुनील तटकरे दोन दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 

जयंत पाटलांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही 

जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत सुनील तटकरे म्हणाले की, धनंजय मुंडे कुठे जाण्यासाठी इच्छुक आहेत, असं मला वाटत नाही. असे आत्मघाती वक्तव्य करत जयंत पाटील नेमकं कुठल्या मार्गावर जात आहे असं मला त्यांना विचारायचं आहे. लाडकी बहीण ऐवजी लाडकी बायको आणा, असं म्हणणारे जयंत पाटील यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी जयंत पाटलांवर केली आहे. 

अजितदादांची जनसन्मान यात्रा नाशिकमधून निघणार

नाशिकमध्ये झालेल्या बैठकीबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावा अर्थसंकल्प मांडला.  राज्याच्या अर्थकारणाला, समाजकारणाला, सर्वांना ताकद देणारा संकल्प राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मांडला गेला. अजितदादांची जनसन्मान यात्रा आम्ही ऑगस्टपासून सुरू करत आहोत त्याची सुरुवात नाशिकपासून करणार आहोत. सर्व घटकांची अजितदाद थेट संवाद साधणार आहेत. माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे.  सर्वच मतदार संघातून यात्रा जाणार आहे. काही सत्रामध्ये शेतकरी वर्ग, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. या यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

नरहरी झिरवाळ बैठकीला गैरहजर, सुनील तटकरे म्हणाले...

नाशिकच्या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अनुपस्थित होते. ते नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. याबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, उद्या दिंडोरीची सभा आहे. आजच्या सभेला नरहरी झिरवाळ उपस्थित नाही याचा अर्थ असा नाही की ते नाराज नाहे. सगळा बातम्या पेरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

आणखी वाचा

Jayant Patil : 'धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं आत्मघातकी प्लॅन', जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हालABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कारGadchiroli C60 Commando : नक्षल्यांचा खात्मा करणारी 'सी-60' आहे तरी कोण? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Astrology : यंदाचा प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
प्रजासत्ताक दिन 3 राशींसाठी ठरणार खास; 26 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Chhaava :
"तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Embed widget