![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Tatkare : नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळवण्यात राष्ट्रवादी अपयशी, मात्र...; सुनील तटकरेचं मोठं वक्तव्य
Sunil Tatkare : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत अनेक दिवस सुरु कायम होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
![Sunil Tatkare : नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळवण्यात राष्ट्रवादी अपयशी, मात्र...; सुनील तटकरेचं मोठं वक्तव्य Sunil Tatkare Big statement on candidature of Nashik Lok Sabha Constituency Mahayuti Seat Sharing Maharashtra Politics Marathi News Sunil Tatkare : नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळवण्यात राष्ट्रवादी अपयशी, मात्र...; सुनील तटकरेचं मोठं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/41057dd93b3264e151f78ebd0c8db1f41715865140152923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sunil Tatkare : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा महायुतीत (Mahayuti) अनेक दिवस सुरु होता. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. नाशिकच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला.
नाशिकमधून उमेदवार घोषित करायला उशीर झाला
सुनील तटकरे म्हणाले की, एनडीएचे आम्ही घटक आहोत. राहिलेल्या तीन दिवसात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करण्यासाठी बैठक झाली आहे. नाशिकमधून उमेदवार घोषित करायला उशीर झाला हे निश्चित आहे. आम्ही भाजप व सेनेच्या पाठीशी राहणार आहोत. आतापर्यंत विरोधात निवडणूक लढलो आहोत. मात्र आता महायुतीत असल्याने अखेरच्या टप्यात सगळ्यांनी सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिकची लोकसभेची उमेदवारी मिळवण्यात राष्ट्रवादी अपयशी, मात्र...
नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. नाशिकची लोकसभा उमेदवारी मिळवण्यात आम्हाच्या राष्ट्रवादी पक्षाला अपयश आले हे मान्य आहे. मात्र आता आम्ही महायुतीत असून प्रचार सुरू केलाय. अजित दादांची तब्येत ठीक नसल्याने ते काल सुद्धा मुंबईत हजर नव्हते. त्यामुळे आज मी नाशिकला आलोय.
माणिकराव कोकाटे स्पष्ट वक्ते
हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे नाराज होते. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली. याबाबत सुनील तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, माणिकराव कोकाटे स्पष्ट वक्ते आहेत. त्याचा फटका मला ही बसला होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
आम्ही आजही महायुतीत आहोत व पुढेही राहू
ते पुढे म्हणाले की, कोणी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये. दिंडोरी मतदारसंघातील चारही आमदार सक्रिय आहेत. त्यांच्या मनातल्या भावना मी समजून घेतल्या असून आता भारती पवारांबाबतची नाराजी दूर झालीय. विरोधकांना पराजायचे चित्र दिसत असल्याने स्थानिक पातळीवरची टीका केलीय जातेय. आम्ही आजही महायुतीत आहोत व पुढेही राहू, असे त्यांनी यावेळी म्हटले.
अजितदादाच आमचे नेते
शरद पवार यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेबाबत सुनील तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांचं दैवत्व आम्ही नाकारलं नाही. त्यांच्यावर मी टीका करू शकत नाही. मात्र आमचे नेते अजित दादा आहेत, असे त्यांनी म्हटले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना योग्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या पिंपळगाव येथील सभेत भाषणावेळी शेतकऱ्याने कांद्यावर बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. यावर सुनील तटकरे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना योग्य आहेत. आचारसंहिता संपल्यावर यावर योग्य निर्णय घेतला जाईल. भुजबळांनी सुद्धा याबाबत पंतप्रधान मोदी यांना पत्र दिले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)