एक्स्प्लोर

Sanjay Raut : भाजपनं नवीन इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केलीय का? प्रसाद लाडांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याची यांची लायकी नसल्याचे राऊत म्हणालेत.

Sanjay Raut : भारतीय जनता पक्षानं (BJP) इतिहास संशोधन मंडळाची नव्यानं स्थापना केलीय का? असा खडा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याची यांची लायकी नसल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे. आज ते मुंबईकडे रवाना होणार आहेत, त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली.

तुम्ही कर्नाटकच्या 'आरे'ला 'कारे' कधी करणार?

कर्नाटकच्या आरेला कारेनं उत्तर देऊ, असे वक्तव्य भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली, कर्नाटक महाराष्ट्रात घुसलंय, तुम्ही त्यांच्या 'आरे'ला 'कारे' कधी करणार? असा सवाल राऊतांनी यावेळी केला. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षांची आहे. तुम्हाला उद्यापर्यंत दिसेल विरोधी पक्ष काय करणार ते असेही ते म्हणाले. 

विरोधी पक्षसुद्धा लवकरच भूमिका जाहीर करणार 

महाराष्ट्राची जनता ही ताकद आहे. उदयनराजे भोसले असतील किंवा संभाजीराजे छत्रपती असतील ते आपापल्या पद्धतीनं जागरुकता निर्माण करत आहेत. विरोधी पक्षसुद्धा लवकरच त्यासंदर्भात आपली भूमिका जाहीर करेल. उद्या किंवा परवा याबाबत आम्ही बोलू असेही राऊत यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत भाजपचे लोकं जी अभद्र भाषा वापरतात ते लोक शिवसेनेच्या बाबतीतही अभद्र बोलू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना यांचे एक नातं आहे. त्याच्यामुळं जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं बोलतात ते आम्हाला काय सोडणार असेही राऊत म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले होते प्रसाद लाड

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी लाड यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.  
  
महत्त्वाच्या बातम्या:

Prasad Lad : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात, भाजपच्या प्रसाद लाड यांचं वक्तव्य; राष्ट्रवादीचा जोरदार हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election: मोठी बातमी: राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला? आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला? आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
Solapur Election 2025 : सोलापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती! दहा पैकी सात ठिकाणी भाजप अन् शिवसेना आमने-सामने; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
सोलापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती! दहा पैकी सात ठिकाणी भाजप अन् शिवसेना आमने-सामने; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Nagarparishad LIVE: राज्यात 262 नगरपरिषद, नगरपंचायतीत आज मतदान, राज्यातील मतदार कोणाला कौल देणार?
Maharashtra Election LIVE: राज्यात 262 नगरपरिषद, नगरपंचायतीत आज मतदान, राज्यातील मतदार कोणाला कौल देणार?
Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Local Body Election Voting : मुंबई वगळता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आज मतदान, एक कोटी मतदार निवडणार 6304 प्रतिनिधी!
CM DCM Naraji : शिंदे-फडणवीस एकाच हॉटेलमध्ये पण दुराव्याची भिंत? Special Report
Mohan Bhagwat On Indian Language : भाषेचा प्रांत, सरसंघचालकांची खंत Special Report
AI Local Ticket : AI वापरून बनवला लोकलचा 'पास' पण टीसीपुढे नापास Special Report
Shahjibapu patil Home Raid : शहाजीबापूंवर धाड, महायुतीत भगदाड? Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election: मोठी बातमी: राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला? आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला? आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
Solapur Election 2025 : सोलापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती! दहा पैकी सात ठिकाणी भाजप अन् शिवसेना आमने-सामने; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
सोलापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती! दहा पैकी सात ठिकाणी भाजप अन् शिवसेना आमने-सामने; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Nagarparishad LIVE: राज्यात 262 नगरपरिषद, नगरपंचायतीत आज मतदान, राज्यातील मतदार कोणाला कौल देणार?
Maharashtra Election LIVE: राज्यात 262 नगरपरिषद, नगरपंचायतीत आज मतदान, राज्यातील मतदार कोणाला कौल देणार?
Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
Nilesh Rane Malvan Nagarparishad: निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना घेरलं, पोलीस ठाण्यात अचानक नंबरप्लेट नसलेली अज्ञात कार पोहोचली, नेमकं काय घडलं?
निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना घेरलं, पोलीस ठाण्यात अचानक नंबरप्लेट नसलेली अज्ञात कार पोहोचली, नेमकं काय घडलं?
8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगावर पहिल्याच दिवशी लोकसभेत प्रश्न, सरकारनं मूळ वेतन आणि महागाई भत्त्यावर उत्तर देताना काय म्हटलं?
लोकसभेत 8 व्या वेतन आयोगावर पहिल्याच दिवशी प्रश्न, सरकारनं मूळ वेतन आणि महागाई भत्त्यावर काय म्हटलं?
Malvan Nagarparishad Election: मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड सापडली, निलेश राणेंचा रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या
मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड सापडली, निलेश राणेंचा रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Embed widget