Prasad Lad : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात, भाजपच्या प्रसाद लाड यांचं वक्तव्य; राष्ट्रवादीचा जोरदार हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Prasad Lad : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने ट्वीट करत प्रसाद लाड यांचा तो व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असंही त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— NCP (@NCPspeaks) December 4, 2022
स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नवीन वादाला तोडं फुटण्याची शक्यता आहे. लाडांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे. आता प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या अडचणीत वाढ होणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय म्हणालेत प्रसाद लाड
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी लाड यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
अमोल मिटकरींची प्रसाद लाड यांच्यावर टीका
दरम्यान, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लाडांच्या वक्तव्यावरुन आता भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रसदा लाड यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रावदी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे. प्रसाद लाड यांना ठरवून दिलेली स्क्रिप्ट आहे. ती स्क्रिप्ट वाचून ते बोलत आहेत. प्रसाद लाड यांनी नवीन जावई शोध लावला आहे. लाड यांनी वक्तव्य केल्यानंतर प्रविण दरेकर काहीच बोलत नसल्याचे मिटकरी म्हणाले. भाजपच्या लोकांनाकडून रोज नवीन वक्तव्य होत आहेत. राज्यपाल असतील, मंत्री मंगलप्रभात लोढा असतील आता प्रसाद लाड असतील हे लोक ठरवून चुकीचं बोलत असल्याचे मिटकरी म्हणाले. यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठेही बोलताना दिसत नसल्याचे मिटकरी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वारंवार भाजपकडून चुकीची वक्तव्य होत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्याचा निषेध झाला पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या: