एक्स्प्लोर

मोठी बातमी : ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट

उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषद आमदार एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट आल्याचे दिसून येत आहे.

Vidhan Parishad Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Division teachers Constituency) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृती होणार आहे. 7 जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 10 जून रोजी छाननी होणार असून 12 जूनपर्यंत माघारीची मुदत आहे. निवडणुकीसाठी (Election 2024) 26 जून रोजी मतदान आणि 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर हे पाच जिल्हे मिळून शिक्षक मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले असताना उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे विधान परिषद आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. 

किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात? 

नाशिक विभागाचे शिवसेना ठाकरे गटाचे पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे (Kishor Darade) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून किशोर दराडे हे महायुतीच्या अनेक कार्यक्रमात दिसून आले आहेत. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आतापर्यंत किशोर दराडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. किशोर दराडे नेमकी काय भूमिका घेणार? ठाकरेंकडून की शिंदेंकडून ते निवडूक लढवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संदीप गुळवेंना महाविकास आघाडीचा पाठींबा? 

तर नाशिक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूला मोठी स्पर्धा लागल्याच्या दिसून येत आहे. काँगेसचे संदीप गुळवे (Sandip Gulve) हे सुद्धा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. संदीप गुळवे यांना टीडीएफकडून उमेदवारी मिळाली आहे. संदीप गुळवे हे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा पाठींबा मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) त्यांना पाठींबा मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

विवेक कोल्हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

तर अहमदनगरनगरचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हे महायुतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. गणेश कारखाना निवडणुकीपासून विवेक कोल्हे हे चर्चेत आले आहेत. विवेक कोल्हे हे आजच आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 9 वाजता येसगाव येथून त्यांनी नाशिककडे प्रयाण केले आहे. दुपारी एक वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आता महायुतीकडून विवेक कोल्हे यांना उमेदवारी मिळणार की दुसरा उमेदवार महायुती निवडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

Maharashtra Legislative Council Election 2024: कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पानसेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट; महायुतीचा पाठिंबा?, चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget