एक्स्प्लोर

'आम्ही केलं ते पाप त्यांनी केलं ते पुण्य'; गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजरांची पहिली प्रतिक्रिया

Nashik News : ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sudhakar Badgujar नाशिक : मुंबई बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) सोबत सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा एक तथाकथित व्हिडिओ समोर आला होता. याप्रकरणी नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावर सुधाकर बडगुजर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

सुधाकर बडगुजर म्हणाले की, 8 वर्षानंतर गैरकृत्य केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. तिथे असणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मी फक्त तिथे 5 मिनिट होतो. त्यामुळे तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न निंदनीय

खासदार हेमंत गोडसेंचा (Hemant Godse) देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. गुन्हा दाखल झाला असेल तर न्यायालयात जाईल. दुःख हे आहे की, 8 वर्षांपूर्वीच्या घटनेत हा गुन्हा दाखल झाला आहे. 6 वर्षानंतर केस बंद करण्याचा निर्णय सरकारचा आहे. आम्ही केले ते पाप त्यांनी केले ते पुण्य असे सरकार वागत आहे.  उद्धव साहेब माझ्यासोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज चाललो आहे, असे बडगुजर यांनी म्हटले आहे.    

नितेश राणेंनी केला होता व्हिडिओ शेअर

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मागील हिवाळी अधिवेशनात शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. याबाबतचा एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्वीट केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. 

सलीम कुत्तासोबतची पार्टी भोवली

त्यानंतर नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) गुन्हे शोध पथकाने या प्रकरणी तपास सुरु केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात काही गोष्टी समोर आल्यावर अखेर सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्टीत बडगुजर उपस्थित होते, काही भेटवस्तू दिल्या गेल्या, असे पोलिसांच्या चौकशीत झाले निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सुधाकर बडगुजरांना सलीम कुत्तासोबतची पार्टी भोवली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Krishnaraaj Mahadik on Nashik IT Company Conversion case: नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक, कृष्णराज महाडिकांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'महिलांच्या सुरक्षेसाठी...'
नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक, कृष्णराज महाडिकांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'महिलांच्या सुरक्षेसाठी...'
Gopichand Padalkar on Nashik IT Company conversion Case: हिंदू 2090 पर्यंत अल्पसंख्याक होतील, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांचा दावा
हिंदू 2090 पर्यंत अल्पसंख्याक होतील, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांचा दावा
Ashok Kharat and Rupali Chakankar: सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? बीडमधील इसमाची अशोक खरात प्रकरणातील SIT कडे तक्रार, राजकीय वर्तुळात खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? बीडमधील इसमाची अशोक खरात प्रकरणातील SIT कडे तक्रार, राजकीय वर्तुळात खळबळ
Ashok Kharat Nashik Crime: पोलिसांच्या सततच्या चौकशीने अशोक खरात खचला, म्हणाला, 'मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे'
सततच्या चौकशीने अशोक खरात खचला, म्हणाला, 'मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे'

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Embed widget