एक्स्प्लोर

Nashik Sanjay Raut : सरकारला प्रश्न विचाराल तर तुरुंगात जाल, याचं मी उदाहरण, संजय राऊतांचे टीकास्त्र 

Nashik Sanjay Raut : तुम्ही आमचे गळे दाबून आम्हाला तुरुंगात डांबून कोणत्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहात? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

Nashik Sanjay Raut : देशांमध्ये अशा प्रकारचे वर्तन वृत्तपत्रांच्या (News Papers) बाबतीत फार कधी घडल्याचं स्मरणात नाही. सरकारला प्रश्न विचारले जातात, तिथे अशा प्रकारच्या धाडी टाकल्या जातात. अनेकदा अटक केली जाते, याचं मी उदाहरण असल्याचे सांगत लोकशाही संकटात आहे, असल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. 

आज सायंकाळी नाशिकमध्ये (Nashik) आगमन झाल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बीबीसीच्या कार्यालयावर (BBC) छापेमारीबाबत संजय राऊत म्हणाले, सरकारला प्रश्न विचारले जातात, तिथे अशा प्रकारच्या धाडी टाकल्या जातात. अटक केली जाते, याचं मी उदाहरण आहे. लोकशाही संकटात आहे. या देशामध्ये अशा प्रकारचे वर्तन वृत्तपत्रांच्या बाबतीत फार कधी घडल्याचं स्मरणात नाही आणि आणीबाणीमध्ये वृत्तपत्रांमध्ये सेन्सॉरशिप लावली. याच भारतीय पक्षानं मोठे आंदोलन उभारलं होतं. त्यांचं सरकार आल्यानंतर न्यायपालिका आणि वृत्तपत्र यांचं गळा घोटण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न विचारला, तेव्हा राहुल गांधींना नोटीस देण्यात आली, असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले कि, बीबीसीने काही विषयावर डॉक्युमेंटरी (BBC Documentary) केली. त्यांच्या कार्यालयावर आज छापेमारी करण्यात आली आहे. देशांमध्ये लोकशाही आहे, तुम्ही उत्तर द्या, तुमचं ही ऐकले जाईल. तुम्ही अनेक माध्यमांचे मालक आहात. अदानीने सर्व माध्यम आपल्याकडे विकत घेतली आहेत. तुम्ही आमचे गळे दाबून आम्हाला तुरुंगात डांबून कोणत्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहात? असा सवाल त्यांनी केला. पंडित नेहरू पासून राजीव गांधी, मनमोहन सिंगांपर्यंत कोणत्याही राजवटीमध्ये या देशात अशा प्रकारचं वृत्तपत्रांच्या बाबतीत वाईट कृत घडल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे आपल्या लोकशाही संदर्भात जगामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

उद्योगानंतर आता तीर्थक्षेत्रही पळवू लागले 

भीमाशंकर हे आसाममध्ये असल्याचं एका नेत्याने म्हटलं आहे. त्यावरून संजय राऊत म्हणाले की आसामच्या संदर्भात आपल्या मुख्यमंत्र्यांचा अतिव प्रेम आहे. कामाख्या देवी वगैरे, आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आमचे मुख्यमंत्री काय बोलतात, हे पहावे लागणार आहे. हा एक पोरकटपणा वाढत चालला असून गुजरात आपल्या उद्योगांवर आक्रमण करत आहे. आता आसामचे मुख्यमंत्री आपल्या देवधर्मांवर आक्रमण करू लागले आहे. हे काही चांगलं नसल्याचे राऊत म्हणाले.

मतदारांचा कौल स्पष्ट आहे.. 

पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी थेट अमित शहा (Amit Shaha) येत आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, यावरून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे. विधान परिषद निवडणुकांमध्ये एखादी जागा वगळता सर्व जागा या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. हजारो शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी त्यांचा कौल आणि कल हा स्पष्ट दिला आहे. हे सर्वे जे येतात ते दोन ते तीन हजार लोकांचे नमुने घेऊन केले जातात. या निवडणुकांमध्ये 50 ते 60 हजार त्याचबरोबर एक लाखांपर्यंत मतदान प्रक्रिया होत असते. यामुळे लक्षात येते की या लोकांनी भाजप पक्षाला नाकारले आहे आणि तोच निकाल कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही. 
 
न्यायपालिकेवर आमचा विश्वास... 

उद्धव ठाकरे यांनी आज बोहरी समाजाची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या दिवशी आले होते. त्या दिवशी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण होते. मात्र त्या दिवशी ते जाऊ शकले नाही. मात्र आज ते आवर्जून बोहरी समाजाला भेटण्यासाठी गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि बोहरी समाज यांचे घनिष्ठ संबंध होते. आम्ही देखील अनेक सोहळे कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवलेली आहे. तर सुप्रीम सुनावणीवर संजय राऊत म्हणाले की, उद्या काय होते ते बघूया. मात्र आज ज्या पद्धतीने मंत्री उदय सामंत म्हणाले कि, काही झालं तरी निकाल आमच्या बाजूने लागेल. त्याचबरोबर नारायण राणे यांनी देखील ब्रेकिंग न्यूज दिली की चिन्ह हे शिंदे यांना मिळणार, तसेच काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे देखील म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आपल्या बाजूला लागेल याचा अर्थ असा आहे की न्यायपालिका यांच्या खिशात असल्यासारखे वागत आहेत. मात्र आम्ही इतकेच सांगू की न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget