एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : भुजबळांच्या माघारीनंतरही महायुतीत नाशिकचा गुंता सुटेनाच, शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात भाजपची पुन्हा उडी

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा अजूनही कायम आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात पुन्हा एकदा भाजपने उडी घेतली आहे.

Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी उमेदवारी घोषित करून तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपात (Mahayuti Seat Sharing) नाशिकचा तिढा अजूनही कायम आहे. 

महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकच्या जागेसाठी आग्रही होते. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेतून (Nashik Lok Sabha Constituency) निवडणूक लढण्यास माघार घेतली. तसेच या मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी याआधी केली होती. 

शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात पुन्हा एकदा भाजपची उडी

छगन भुजबळ यांच्या माघारीच्या घोषणेनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. आता शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वादात पुन्हा एकदा भाजपने उडी घेतली आहे. नाशिकची जागा भाजपला देण्याची मागणी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

महायुतीत नाशिकचा तिढा सुटेना, मविआची प्रचारात आघाडी

नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. नाशिक, त्रंबकेश्वर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपची अधिक ताकद असल्याने ही जागा भाजपलाच सुटावी, अशी मागणी नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पुढील चार दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. नाशिकचा तिढा सत्ताधारी घटक पक्षांना सोडवता येत नसल्यानं मविआची प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

हेमंत गोडसेंना पक्षातूनच आव्हान

दरम्यान, नाशिक लोकसभेसाठी खासदार हेमंत गोडसे हे इच्छुक असतानाच त्यांना त्यांच्याच पक्षातून आव्हान निर्माण झाले आहे. शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता शिंदे गटात दोन गट पडल्याचे चित्र आहे. नाशिकची जागा शिवसेनेला मिळाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेमंत गोडसे की अजय बोरस्ते? कुणाला पसंती देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघडSai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट, शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? 
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Embed widget