Dada Bhuse : चुकीचं वक्तव्य केलं तर न्यायालयात आपण दाद मागूच , दादा भुसेंचा राऊतांवर निशाणा
Dada Bhuse : संजय राऊतांनी माझ्यावर खोटे आरोप केले आणि याबाबत मी उत्तरही सभागृहात दिलं आहे, असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं.
नाशिक : संजय राऊत (Sanjay Raut) यांना बोलून काहीही फायदा नाही दररोज काहीही वक्तव्य करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यांनी चुकीचे वक्तव्य केले तर न्यायालयात आपण दाद मागूच असं मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये म्हटलंय. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. दरम्यान याच प्रकरणी जामिनासाठी या संजय राऊत शनिवार 2 डिसेंबर रोजी मालेगाव न्यायालयात दाखल होणार आहेत. ठाकरे गटाकडून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाईल. त्यातच दुसरीकडे दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
यावेळी दाद भुसे यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणे विषय चांगला आहे पण आर्थिक बाबीचे सोंग सरकार कोणाचेही असू दे आणू शकत नाही असं म्हणत दादा भुसेंनी जयंत पाटलांच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांना बोलून काही फायदा नाही - दादा भुसे
संजय राऊतांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्याचं उत्तरही मी सभागृहात दिलं होतं. त्यांच्याविरोधात मालेगाव न्यायालयात मी दावा देखील दाखल केलाय. ते आता त्या दाव्याच्या जामिनासाठी जात आहेत. त्यांना बोलून असंही काही फायदा नाही. दररोज काही वक्तव्य करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण जर त्यांनी काही चुकीचं वक्तव्य केलं तर आम्ही न्यायालयात दाद मागू, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली.
'पण आपण आर्थिक बाबींचे सोंग आणू शकत नाही'
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत अशी मागणी केलीये. यावर देखील मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलंय. सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे विषय चांगला आहे पण आर्थिक बाबीचे सोंग सरकार कोणाचेही असो ते आणू शकत नाही. जयंत पाटील यांनी वित्तमंत्री पासून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. शेतकरी मदत प्रकरणी कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. पंचनाम्यांचं काम प्रगतीपथावर आहे, असं दादा भुसे यांनी म्हटलं.
हेही वाचा :