(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Nashik Lok Sabha Constituency : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठींबा असल्याचा दावा अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Shantigiri Maharaj : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहे. प्रचारात अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज देखील मागे नाहीत. शांतीगिरी महाराजांकडून (Shantigiri Maharaj) नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. शांतीगिरी महाराज प्रचारासाठी दररोज नवनवीन फंडे शोधत आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून शांतिगिरी महाराजांनी आज भव्य प्रचार रॅली काढली आहे. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठा दावा केला.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. नाशिकच्या गंगा घाटावरून शांतीगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली आहे. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.
भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठींबा - शांतीगिरी महाराज
यावेळी एबीपी माझाशी संवाद साधताना शांतीगिरी महाराज म्हणाले की, ही आमची शोभा यात्रा आहे. हे शक्ती प्रदर्शन नाही. समाज आमच्यावर प्रेम करतो. भाजपसह समाजातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठींबा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, यंदा लढायचे आणि जिंकायचे. त्यामुळे विजय निश्चितच आमच्या बादलीचा होणार आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.
शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) असताना भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आपल्यासोबत आहेत, असे शांतीगिरी महाराजांनी म्हटल्याने चर्चांना उधाण आले असून शांतीगिरी महाराजांच्या दाव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात रंगत वाढली
अलीकडेच शांतीगिरी महाराजांनी सायकलवरून प्रवास करत नाशिकमध्ये प्रचार केला. एखाद्या मुरब्बी राजकीय नेत्या प्रमाणेच शांतीगिरी महाराज प्रचारात नवनवीन फंडे आजमावत आहेत. कधी रथात बसून, कधी बैलगाडी मधून प्रचार करणाऱ्या शांतीगिरी महाराजांनी पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश देत सायकलवर बसून प्रचार केला. यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात रंगत वाढल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा