आम्हाला हिंदुत्व शिकवता, लाहोरी बारच्या बिलात बीफ कटलेटचाही समावेश; नागपूर अपघात प्रकरणी संजय राऊत यांचा गंभीर आरोप
नागपूर ऑडी हिट अँड रन प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले असताना लाहोरी बारमधल्या बिलामध्ये दारूचा उल्लेख आहे. सोबतच त्यात चिकन, मटण आणि बीफ कटलेटचा समावेश असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut मुंबई : नागपूरमध्ये झालेला अपघात (Nagpur Accident) जर एखाद्या सामान्य माणसाने केला असता, तर त्याचे काय हाल झाले असते याचा विचार आपण केला पाहिजे. पोलिसांनी त्यांना पकडून रस्त्यावर त्यांची धिंड काढली असती. मात्र, या राज्यात सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे आहे एका नेत्याचा मुलगा सुटतो, तो कुणाचा मुलगा आहे हे महत्त्वाचे नाही. तर कायदा सुव्यवस्था हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असे आमचे मत आहे.
महाराष्ट्राच्या कायद्यासव्यवस्थेच्या बाबतीत सध्या धिंडवडे काढले जात आहे. काळ्याकुट्ट अक्षरात ही घटना लिहिली जाईल. अशा प्रकारचा घटिया गृहमंत्री या राज्याला कधीही लाभला नाही. नागपुरात त्यांच्यासमोर इतका मोठा अपघात झाला, त्यात अनेक लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असताना ज्याचे नावे वाहन आहे त्याचा साधे नाव सुद्धा एफआयआरमध्ये नाही. जो व्यक्ती वाहन चालवत होती त्याचे नाव बदलण्यात आले आहे. किंबहुना लाहोरी बार मध्ये जे बिल आहे ते लोकांसमोर आले पाहिजे. त्या बिलामध्ये दारूचा उल्लेख आहे. सोबतच त्यात चिकन, मटण आणि बीफ कटलेटचा अर्थात गोमांस याचा देखील त्यात समावेश आहे आणि हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही
एकीकडे आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी सांगायच्या, श्रावण आहे, गणपती आहे, असे सांगायचे. तर दुसरीकडे गोमांस खाऊन रस्त्यावर सर्वसामान्यांचे जीव घ्यायचे, हे राज्यात चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ज्या प्रकारे राज्यात या घटना घडत आहेत, या पद्धतीने तुम्ही राज्य चालवत आहात, चार वर्षाचे प्रकरण उकरून काढत आमच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्याला निघाले आहात, मात्र तुमच्याच पक्षाच्या एका नेत्याच्या मुलाने अनेक गाड्यांना चिरडून निष्पाप लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही अभय देत आहात. त्यामुळे हे पाप तुम्ही कुठे फेडाल? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे ही वाचा