एक्स्प्लोर

Sanjay Raut : संजय राऊतने कधी माफी मागितली नाही; सत्य सत्य आहे तर माफी का? दादा भुसेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी; राऊतांचा टोला

संजय राऊतने कधी माफी मागितली नाही. दादा भुसेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. संजय राऊत मालेगाव दौऱ्यात शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. 

नाशिक : मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर शिवसेना खासदार संजय खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी दादा भूसेंवर पुन्हा तोफ डागली. संजय राऊतने कधी माफी मागितली नाही. दादा भुसेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. संजय राऊत यांनी मालेगाव दौऱ्यात शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. 

राजकीय सुडाने कारवाई केली जात आहे

संजय राऊत (Sanjay Raut on Dada Bhuse) म्हणाले की, आमचा मालेगावचा एक लढवय्या नेता तुरंगात आहे. मी याठिकाणी आहे. राजकीय सुडाने कारवाई केली जात आहे. गिरणा सहकारी कारखाना (Girna Sugar factory) संदर्भात दादा भुसे यांनी 178 कोटी रुपये जमवले आहेत, त्याचा हिशेब द्या. हा हिशोब मागतो तर आम्ही गुन्हेगार झालो आहोत. आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

संजय राऊतने कधी माफी मागितली नाही

मी घाबरत नाही, पाय लावून पळत नाही डरपोक आहोत का? तुमच्यासारखं नाही, नोटीस आली की गेले दुसऱ्या कोर्टात. संजय राऊतने कधी माफी मागितली नाही, सत्य सत्य आहे तर माफी का? दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. 2024 नंतर सर्व दखल घेतली जाईल, आम्ही हिशोब मागत आहोत, ते काय पुरावा मागतात,तुरंगात जाण्याची तयारी ठेवा, असेही संजय राऊत म्हणाले. 

चोराला चोर म्हणणारच, दादा भुसेंवर हल्लाबोल

दुसरीकडे, मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी गिरणा साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून 178 कोटी रुपये गोळा केले, त्याचा हिशेब द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केल्यानंतर भुसे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी आज पार पडली. आजच्या सुनावणीत कोर्टाने दोन्ही नेत्यांना तडजोड करु शकता का? असं विचारलं. त्यावर संजय राऊत यांनी नाही म्हणून सांगितलं. आता याप्रकरणी  3 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी संजय राऊत यांना हजर राहण्याचे आदेश दिले. चोराला चोर म्हणण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. चोराला महात्मा मी म्हणू शकत नाही, तो घटनेचा अपमान होईल. तुम्ही अद्वय हिरेंना तुरुंगात टाकता, मग दादा भुसेंचा 178 कोटींचा घोटाळा असताना तुम्ही त्यांना अटक का करत नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Maharashtra Rain : सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Telangana Rain : तेलंगणामध्ये पावसाचा कहर; 29 जणांचा जीव गेला,रेवंथ रेड्डींनी बोलावली आढावा बैठकSalman Khan Ganpati Bappa : सलमान खानच्या घरच्या बाप्पाचं आज विसर्जनABP Majha Headlines :  8  AM :  8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सDagdusheth Halwai Ganpati : पुण्यात हजारो महिलांनी एकत्र येत केलं अथर्वशीर्ष पठण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
जरांगेंवर आरोप करणं थांबवा, यापुढे विजयाचा गुलाल उधळू देणार नाही, मराठा आंदोलकाने भुजबळांना सुनावले
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Maharashtra Rain : सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget