Rohit Pawar : बालेकिल्ला कोणाचा हे लोक दाखवून देतील, पवारसाहेबांनी सांगितलेल्या नावावर लोक विश्वास ठेवतील : रोहित पवार
बालेकिल्ला कोणाचा हे येत्या काळात लोक दाखवून देतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाशिकमधील (Nashik) येवला इथं केलं.
Rohit Pawar : बालेकिल्ला कोणाचा हे येत्या काळात लोक दाखवून देतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाशिकमधील (Nashik) येवला इथं केलं. पवारसाहेब ज्यांचे नाव घोषित करतील, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये लोक निर्णय घेतात कोणाला निवडून द्यायचे ते, व्यक्ती बघून, विचार बघून लोक मतदान करतात असेही रोहित पवार म्हणाले. येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा झाल्यानंतर रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार यांची येवल्यात (Yeola) जाहीर सभा पार पडली. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शरद पवरा यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार उपस्थित होते. पवार साहेब येणार समजलं तर हजारोच्या संख्येने येथे कार्यकर्ते हजर झाले. येवल्यात अतिशय ताकदीने आणि मोठी सभा झाल्याचे शरद पवार म्हणाले. इथे पैसे देवून आणलेले लोक नव्हते असंही ते म्हणाले. पवार साहेबांनी योग्य माणसांना पद दिले होते. मात्र, जेव्हा हे लोक विचार सोडतात तेव्हा मात्र तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मतदारांचा विश्वासघात करता. मतदारांचा विश्वासघात झाल्यामुळं पवार साहेबांनी मतदारांची माफी मागितली असावी असे रोहित पवार म्हणाले. भविष्यात येवला मतदारसंघात पवार साहेब जे नाव घोषित करतील, त्या नावावर लोक पुन्हा विश्वास ठेवतील, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
पक्षात फूट पडल्यानंतर येवल्यात पवारांची पहिलीच सभा
राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी नऊ आमदारांना सोबत घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राजकीय घमासान सुरु आहे. दोन्ही गटाच्या बैठका पार पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्यांनी येवल्यातून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली. काल त्यांची येवल्यात पहिली जाहीर सभा झाली. या सभेला जाताना पवार पावसात भिजल्याचे पाहायला मिळालं. मागच्या वेळी पवार जेव्हा पावसात भिजले, तेव्हा त्याचा परिणाम राज्यातील राजकारणात दिसला होता.
नेमकं काय म्हणाले शरद पवार
महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्याने गेली अनेक वर्ष पुरोगामी विचाराला साथ दिली आहे. कोणत्याही जिल्ह्यांनी साथ सोडली नाही, आज मी इथे आलोय तर ते कोणावर टीका करण्यासाठी नाही, आज मी माफी मागण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर तुम्ही साथ दिली. पण माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की तुम्हा सगळ्यांची माफी मागायची, म्हणून आज इथे आल्याचे शरद पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: