एक्स्प्लोर

Raj Thackeray : साहेब तुम्हीच नाशिकमधून निवडणूक लढा! राज ठाकरेंना मनसैनिकांकडून गळ 

Nashik Lok Sabha : नाशिकची जागा जर मनसेला मिळाली तर मनसेची उमेदवारी राज ठाकरे यांनीच करावी, अशी मागणी मनसैनिकांनी राज ठाकरेंना केली आहे. आता राज ठाकरे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर केल्या. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या जागेवर आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. आता खुद्द नाशिकच्या जागेवर मनसेप्रमुख राज ठाकरेंचे (Raj Thackeray) नाव चर्चेत आले आहे. 

मनसैनिकांनीच राज ठाकरे यांना नाशिक लोकसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी पत्राद्वारे गळ घातल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीसाठी आणखी एक नाव पुढे आल्यचे चित्र आहे. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत नाशिकच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. 

राज ठाकरेंनी नाशिकमधून निवडणूक लढवावी

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसेचे अध्यक्ष यांची दिल्लीत भेट झाली. मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी अशा तीन जागांच्या मागणीचा प्रस्ताव मनसेने भाजपसमोर ठेवला आहे. त्यामुळे नाशिकची जागा जर मनसेला मिळाली तर मनसेची उमेदवारी राज ठाकरे यांनीच करावी, अशी मागणी कार्यकत्यांनी केली आहे. त्यासाठी कार्यकत्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आता राज ठाकरे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

काय म्हटलंय पत्रात?

मनसेच्या स्थापनेनंतर नाशिकमधून 12 नगरसवेक निवडून आले होते. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये नाशिक शहरात 40 नगरसेवक, तीन जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य व ग्रामीण भागात 15 नगरसेवक अशी मनसेची विजयी घोडदौड झाली होती. त्यावेळी लोकसभेचे मनसेचे नवखे उमेदवार हेमंत गोडसे यांचा निसटता पराभव झाला होता. पक्षाची पुढील वाटचाल जोमाने झाली.

नाशिकनगरीत मनसेचा महापौर झाला असता, तत्कालीन राज्य सरकारकडून निधी मिळणे दुरापास्त झाले होते. अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या, पाच वर्षात तीन वर्षे आयुक्त नव्हते, तरीसुद्धा राज ठाकरेंनी विविध विकासकामे केल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. मनोज घोडके, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, संदीप भवर, किरण क्षीरसागर, संदीप जगझाप, रोहन जगताप, विजय ठाकरे, संजय देवरे, नितीन धानापुणे, महेंद्र डहाळे आदी मनसैनिकांनी लवकरच राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना नाशिकच्या जागेसाठी आग्रह करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा 

मोठी बातमी : मनसे-भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hording EXCUSIVE : होर्डिंगसाठी उभारण्यात आलेला पाया कमकुवत, फक्त 3 मीटरचीच पायाभरणीPm Modi Varanasi : वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गंगापूजन ,आज भरणार उमेदवारी अर्जABP Majha Headlines : 10  AM :14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Embed widget