मोठी बातमी : मनसे-भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक
Maharashtra News : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत जागावाटपावर (Mahayuti Seat Sharing) चर्चा सुरु असून अद्याप निर्णय झालेला नाही. महायुतीच्या जागावाटपाबाबत लवकरच त्यातच आता मनसे-भाजप युतीवरही (BJP-MNS Alliance) लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये मनसे युतीबाबत महत्त्वाची निर्णय होण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक
महायुतीच्या बैठकीसाठी अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यासोबतच देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे देखील दाखल झाले आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय वर्षा बंगल्यावरील बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसे-भाजप युतीवर शिक्कामोर्तब होणार?
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना पुर्णविराम लागल्याचं काही दिसत नाहीत. पण, आजच्या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागावाटपाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबतही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
अद्यापही महायुतीत चर्चासत्रे सुरुच
महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात अद्याप संभ्रम कायम आहे. भाजपला किती जागा, शिंदे गटाला किती जागा आणि अजित पवार गटाला किती जागा यावर अद्यापही महायुतीत चर्चासत्रे सुरुच आहेत. त्याशिवाय मनसे महायुतीत सामील झाल्यास त्यांना किती जागा देणार यावरही आजच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजप-मनसे युती होणार?
मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. गेल्या काही दिवसांत भाजप नेते आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत आहे. त्यातच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन फडणवीसांची भेट घेतली. यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात असून लवकरच भजप-मनसे युतीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :