एक्स्प्लोर

Nashik Crime News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी करायचे भरदिवसा घरफोड्या; दोन उच्चशिक्षितांच्या आवळल्या मुसक्या

Nashik Crime News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उच्चभ्रू वस्तीत भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या दोन उच्चशिक्षितांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

Nashik Crime News नाशिक : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणुकीसाठी उच्चभ्रू वस्तीत भरदिवसा घरफोड्या (Robbery) करणाऱ्या दोन उच्चशिक्षितांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना (Nashik Police) यश आले आहे. या दोघांनी अनेकदा घरफोडी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रोहन संजय भोले आणि ऋषिकेश उर्फ गुड्डू मधुकर काळे अशी या सराईतांची नावे आहेत.  

हे दोघे शहरासह जिल्ह्यातील आलिशान बंगले हेरून त्यांच्या खिडक्यांचे भरदिवसा लोखंडी ग्रिल कापून आतमध्ये प्रवेश करीत होते. त्यानंतर मास्टर बेडरूममधून मौल्यवान दागिने, वस्तू व रोख रक्कमवर डल्ला मारत होते. यातील एक इंजिनिअर आहे तर दुसरा पदवीधर आहे. दोघांना वापी, दमण परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने अटक केली आहे.  

रोख रक्कम, सोन्याचे क्वॉइन, ब्रॅण्डेड घड्याळ लंपास

गंगापूर रोड परिसरातील शारदानगरमधील शरण बंगल्याच्या किचनच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी ग्रिल कापून आतमध्ये प्रवेश करीत चोरांनी रोख रक्कम, सोन्याचे क्वॉइन, महागडे ब्रॅण्डेड घड्याळ, गोदरेजची लोखंडी तिजोरी असा सुमारे २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज गायब केला होता. याप्रकरणी यश हरीश हेमदानी (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पटली ओळख

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाकडून केला जात होता, घरफोडी करणाऱ्या संशयितांची ओळख घटनास्थळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पटली होती. तसेच संशयितांनी लंपास केलेल्या महागड्या ईयरबड्समध्ये जीपीएस असल्यामुळे त्यांचे लोकेशन फिर्यादीच्या मोबाइलवर प्राप्त झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांनी कसून तपासाला सुरुवात केली. 

वापीतून घेतले ताब्यात

संशयित हे गुजरातच्या वापी परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून ढमाळ यांनी त्यांच्या पथकासह वापी गाठले. संशयित रोहन संजय भोळे (36, रा. उपनगर), ऋषिकेश ऊर्फ गुड्डू मधुकर काळे (27, रा. नाशिकरोड) या दोघांना वापीच्या एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. 

इंट्राडेचा नाद भोवला

जास्त जोखीम असलेल्या शेअर मार्केटच्या इंट्राडे या एकाच दिवसात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांतून जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने संशयित रोहन हा घरफोडीतील सोने-चांदीच्या दागिन्यांची विल्हेवाट लावून ती रकम इंद्राडेमध्ये गुंतवणूक करायचा, असे प्रथमदर्शनी तपासातून उघडकीस आले आहे. घरफोड्यांचा मास्टरमाइंड रोहन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

या दोघांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली चोरीची कार, 30 ग्रॅम सोने व घरफोडीसाठी वापरणारे आधुनिक साहित्य असा सुमारे 7 लाख 53 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चोरीसाठी मागवले ऑनलाइन साहित्य

ग्राइंडर मशिन, 3 उच्च प्रतीची गॅस गन, आधुनिक हायड्रोलिक कटर, लोखंडी कटावणी असे साहित्य संशयित रोहन हा एका बॅगेमध्ये घेऊन रेकी करीत असे. हे साहित्य त्याने ऑनलाइन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. रेकी करताना जे बंद बंगले एकाकी आहेत, त्यांची तो निवड करायचा. दरवाजाचा कडीकोयंडा न तोडता पाठीमागील बाजूच्या खिडक्यांमूधनच रोहन घरफोडी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस

या दोघांची कसून चौकशी केली असता, गंगापूर परिसरातील दोन व ओझर, सिन्नर येथील एक असे एकूण घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांनी यापूर्वीही अनेकदा असे घरफोडीचे गुन्हे केले असल्याची माहिती ढमाळ यांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Rajesh Tope : "भाजपच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले हे..."; राष्ट्रवादीच्या शिबिरात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget