Nashik crime : मालेगावमध्ये नऊ वर्षीय मुलाचा नरबळी? पाच दिवसांपासून बेपत्ता होता, असा झाला उलगडा?
Nashik crime : मालेगाव (Malegaoan) तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे अंतर्गत पोहाणे येथील कृष्णा सोनवणे हा शेतात गेला होता.
Nashik crime : नाशिकच्या (Nashik) मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील नऊ वर्षे मुलाचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. अखेर चार दिवसानंतर या प्रकरणातील चार संशयितांना पोलिसांनी (Malegaon Police) ताब्यात घेतले आहे. गुप्तधनाच्या लालसेतून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मालेगाव (Malegaoan) तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे अंतर्गत पोहाणे येथील कृष्णा अनिल सोनवणे हा शेतात गेला होता. परंतु तो परत न आल्याने घरातील सदस्यांनी त्याचा सर्वत्र तपास केला. मात्र तो मिळून न आल्याने वडनेर खाकुर्डी पोलिसात अपहरण करून पळवून नेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार पोलीस कुटुंबीय शोध घेत असताना मातीच्या ढिगारात पूरलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देवून गुन्हा उघडकीस तपास पथक नेमण्यात आले. त्यानुसार शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक, फिंगरप्रिंट पथक तसेच फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. सदर घटनेतील घटनास्थळावर मिळून आलेल्या पुरण्याच्या वस्तू तसेच श्वान पथकाच्या मदतीने यातील संशयित हे पोहाणे गावातील असल्याचे समोर आले. पोलिसांनी संशयित उमानी गुलाब मोरे यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोली चौकशी केली असता, त्याने रोमा बापु मोरे, रमेश लक्ष्मण सोनवणे, गणेश लक्ष्मण सोनवणे, लक्ष्मण नवल सोनवणे यांची नावे समोर आली. या संशयितांच्या मदतीने कृष्णा यास फूस लावून पळवून नेवून त्यास धारदार चाकू आणि ब्लेडने गळ्यावर वार करून जीवे ठार मारल्याची कबूली संशयितांनी दिली.
दरम्यान चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचे तपासात प्राथमिकदृष्टया गुप्तधनाच्या लालसेपोटी यातील संशयितांनी मयत मुलास जीवे ठार मारले असल्याचे निदर्शनास येत आहे. घटनेचे गांभीर्य पाहता न्यायालयाने संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण पुष्कराज सुर्यवंशी हे करीत आहे.
काय नेमकी घटना होती?
मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथून 16 जुलैपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह गुरुवारी पोहाणे येथील वनविभागाच्या विहिरीजवळ ढिगार्यात उरलेला अवस्थेत आढळून आला. हा मुलगा शेतात गेला होता. मात्र, तोपर्यंत आल्याने घरातील सदस्यांनी त्याचा सर्वत्र तपास केला मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलिसात कृष्णा सोनवणे याचे अपहरण करून पळून नेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह मातीच्या ढिगारात पुरलेल्या अवस्थेत मिळून आला.