Onion : एनसीसीएफ करणार पाच लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी, नाशिकसह 'या' ठिकाणी असणार खरेदी केंद्र
Onion Market : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Onion Market : केंद्र सरकारने (Central Government) ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) काळात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कांद्यावरील निर्यातबंद हटवली (Onion Export) आहे. तसेच 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य (Export Duty) ठेवण्यात आले आहे. यामुळे कांद्याची निर्यात करणं शक्य होणार असून शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. आता एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक, पुणे, गुजरात, हरियाणा या ठिकाणी खरेदी केंद्र असणार आहेत.
कांदा निर्यातबंदी दि. 7 डिसेंबर 2023 रोजी लागू करण्यात आली होती. यामुळे शेतकरी आणि निर्यातदारांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. अलीकडच्या काळात NCEL च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र त्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला आणि कांदा निर्यात खुली केली.
एनसीसीएफ आणि नाफेड करणार कांद्याची खरेदी
केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडमार्फत (NAFED) पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंग (Vishal Singh) यांनी पिंपळगाव बसवंत येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. येत्या जूनपर्यंत नाशिक, पुणे, हरियाणा आणि गुजरात येथूनही पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे विशाल सिंग यांनी सांगितले. खरेदीचे लक्ष्य 5 लाख मेट्रिक टन आहे. त्यात नाफेडसाठी 2.5 आणि एनसीसीएफसाठी 2.5 मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
कांदा खरेदीतून फायदा होणार नाही, शेतकऱ्यांची टीका
दरम्यान, कांद्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकारण पुन्हा चांगलच पेटलं असून हा निर्णय म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा असल्याची टीका शेतकरी संघटनांसह विरोधकांकडून केली. तर दुसरीकडे आमचं सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मत सत्ताधारी नेत्यांनी व्यक्त केले होते. आता निवडणूकीमुळे निर्यातबंदी उठवली असून एनसीसीएफ व नाफेडमार्फत कांदा खरेदीतून फायदा होणार नसल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या