एक्स्प्लोर

National Youth Day : मेकॅनिकल इंजिनिअर युवकानं सुरगण्यात उभारला भन्नाट प्रकल्प, 'रानझोपडी' लाखो पर्यटकांचं आवडत ठिकाण

National Youth Day special story of nashik harshad thavil : सुरगाणा तालुक्यातील युवा इंजिनिअरने नोकरी न करता आपल्या माळरानात कृषी पर्यटन उभारून नंदनवन फुलविले आहे.

National Youth Day : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उच्चशिक्षण घेऊन नोकरी करतात. अशातच ग्रामीण भागातील एखादा तरुण शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागला तर गावात वाहवा होते. पण आता काळ बदलला आहे, तरुण वर्ग शिक्षण घेऊन व्यवसाय, विशेष म्हणजे शेतीकडे वळू लागला आहे. तरीही ग्रामीण भागातील काही ठराविक युवक सोडले तर शेतीकडे वळणारा वर्ग खूप कमीच आहे. परंतु, सुरगाणा तालुक्यातील युवा इंजिनिअरने नोकरी न करता आपल्या माळरानात कृषी पर्यटन उभारून नंदनवन फुलविले आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गारमाळ येथील हर्षद थविल या शिक्षित तरुणाने सुरगाणा सारख्या आदिवासी भागातून येऊन बीई मेकनिकल केले, परंतु पहिल्यापासूनच गावातच काहीतरी करण्याचा निश्चय केलेल्या हर्षल मॅकेनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. मात्र गावाकडच्या मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर इंजिनिअरिंग झाल्यानं हर्षद पुन्हा गावी परतला. गावाकडच्या दुष्काळी शेतीकडे दुर्लक्ष न करता उलट आपली इंजिनिअरिंगची पदवी व त्यापोटी मिळणारी नोकरी व आर्थिक लाभ सोडून गावाकडे येऊन शेतीला नवसंजीवन देण्याचे त्याने ठरविले. हर्षदला झाडांची आवड असल्याने त्याने सुरवातीला कॉफ़ी, कोको, अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लीची, ड्रॅगन फ्रुट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, इलिफंट अप्पेल, पेरू, हापूस आंबे, मँगो स्टीन, सीताफळ, केळी आदी झाडांसह कमळाचे व कुमुदिनीचे वेगवेगळे 13 प्रकारांची लागवड केली.
 
ग्रामीण भागातला हा परिसर नेहमीच पर्यटकांचा आकर्षण ठरलेला असतो. ही बाब हेरून हर्षदने कृषी पर्यटन सुरु करण्याचे ठरविले. या माळरानावर नामशेष होणाऱ्या रानभाज्याची लागवड केली. हळूहळू पाण्याचे छोटे छोटे तलाव, विविध प्रकारची झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी आदी उभारुन कृषी पर्यटन केंद्र उभे केले. या दरम्यान त्याला आवड असलेल्या वारली चित्रकलेचा चांगला उपयोग झाला. येथील झाडांवर, भिंतींवर, विविध ठिकाणी वारली चित्रे काढण्यास सुरवात केली. या कामी त्याने सोशल मिडीयाचा वापर करीत हे पर्यटन केंद्र लोकांसमोर आणले. लागलीच काही मित्रांनी या ठिकाणी भेट देत स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. अनेक दिवसांपासून सुरु केलेल्या कृषी पर्यटन केंद्राला चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. अनेक कुटुंब या ठिकाणी भेट देऊन नैसर्गिक भोजनाचा आस्वाद घेत आहेत.
 

'फॅमिली कॅम्पिंग'ची संकल्पना


सध्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 'फॅमिली कॅम्पिंग' ची संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये आपल्याला या ठिकाणी भेट द्यावयाची असल्यास संपर्क करून पूर्वकल्पना देण आवश्यक असते. त्यानंतर तेथे कृषी पर्यटनाबरोबर पारंपरिक जेवण दिले जाते. यामध्ये नागलीची भाकर, रानभाज्या यासह आदिवासी गावाकडील जेवणाची चव याठिकाणी चाखायला मिळते. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी या कृषी पर्यटनाला भेट दिली आहे. याचबरोबर अनेक कुटुंबीयांनी या रान झोपडीला भेट देऊ न हर्षलचे कौतुक केले आहे. आता तो कृषी पर्यटनाच्या परिसरात वनराई बंधारे बांधून लोकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती करत आहे. 

कलासंग्रहालय उभारण्याचा मानस...

 
शिक्षणानंतर नोकरी न करता कुटुंबासाठी वेळ द्यायचा होता, आणि इथल्या तरुणांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावयाचे होते. त्यामुळे कृषी पर्यटनाची संकल्पना सुचली. ग्रामीण भागात निसर्गाने भरभरून दिल आहे. त्याचा उपयोग पर्यटनासाठी चांगला होतो आहे. हळूहळू या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर रान ,झोपडी परिसरात कलासंग्रहालय उभारून इथल्या स्थानिक कलाकारांच्या कलाकृतीना व्यासपीठ मिळवून देण्याचा मानस असल्याचे हर्षल थवील या युवा इंजिनिअरने सांगितले. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget