Devendra Fadnavis: विशीत दाखवली राजकीय प्रगल्भतेची चुणूक, देवाभाऊंनी मुळ गावातून भाजपचा पहिला विजय खेचून आणला
राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या मुल सावली मतदारसंघातून कशी केली हे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं..
Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची ओळख चाणक्य म्हणून आहे. त्यांच्या राजकीय कौशल्यामुळेच आज भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला असं मानलं जातं. मात्र याच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्वतःच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ गावापासून केली आहे.त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस या 1990 च्या विधानसभा निवडणुकीत मूल-सावली मतदारसंघातून भाजपकडून उभ्या होत्या. त्यांच्या पूर्ण निवडणूक प्रचाराची धुरा ही देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती. त्या काळात त्यांनी ग्रामीण भागात जोरदार प्रचार करून आपल्या काकूंसाठी विजय संपादन केला होता. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातला भाजपचा हा पहिला विजय होता. देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी केलेल्या या निवडणूक प्रचारातून त्यांच्या राजकीय प्रगल्भतेची चुणूक तेव्हाच दिसून आल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलंय.
मुळ गावातून राजकीय कारकीर्द
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या गादीवर बसतील. लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर यंदा महाविकास आघाडीची सत्ता येणार असे अंदाज येत असताना 288 पैकी 132 जागांवर भाजपने कमळ फुलवलं. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन गेले 12 दिवस सुरु असणारा सस्पेंस थांबला आहे. दरम्यान, विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्यांनी फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या मुल सावली मतदारसंघातून कशी केली हे सांगत केल्याचं सांगितलं.
सर्वात तरुण महापैार
नेतृत्व कौशल्यासाठी आणि व्यावहारिक दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे. आणीबाणीच्या काळात वडिलांच्या तुरुंगवासाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. नागपुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, त्यांनी लहान वयातच राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, 1989 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले. अवघ्या 22 व्या वर्षी ते नगरसेवक झाले. अवघ्या 27 व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले.
प्रचाराच्या जोरावर खेचून आणला विजय
आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात फडणवीस हे पक्षीय राजकीय पोस्टर्स आणि भिंतींवर चित्रे लावायचे, यावरून ते तळागाळातील नेते असल्याचे दिसून येते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्वतःच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ गावापासून केली आहे.त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस या 1990 च्या विधानसभा निवडणुकीत मूल-सावली मतदारसंघातून भाजपकडून उभ्या होत्या. त्यांच्या पूर्ण निवडणूक प्रचाराची धुरा ही देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती. त्या काळात त्यांनी ग्रामीण भागात जोरदार प्रचार करून आपल्या काकूंसाठी विजय संपादन केला होता. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातला भाजपचा हा पहिला विजय होता.