Nashik News : नाशिककरांनो पाणी जपून वापरा! शहरातील 'या' भागांत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
Nashik News : नाशिकमधील गंगापूर रोड, कॉलेजरोड परिसरासह काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारीदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Nashik News नाशिक : यंदा पाऊस (Rain) कमी झाल्याने नाशिकमध्ये ऐन फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या (Water Scarcity) झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच आता नाशिकमधील गंगापूर रोड, कॉलेजरोड परिसरासह काही भागात उद्या शुक्रवारी (दि. 23) पाणी पुरवठा बंद (Water Supply Cut) राहणार आहे. तसेच शनिवारीदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
सातपुर विभागातील प्र. क्र. 9 कार्बन नाका, कार्बन कंपनी कंपाऊंड वॉल लगत व श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळेजवळील पाईप लाईनची गळती होत आहे. या पाईप लाईनच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यासाठी उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
सातपूर विभागात पाणीपुरवठा नाही
सातपुर विभागात प्रभाग क्र. 8 मध्ये बळवंतनगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकारनगर, रामेश्वर नगर, बेंडकुळे नगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परीसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकर नगर, पाईपलाईन रोड,काळे नगर, सदगुरु नगर, खांदवे नगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगार नगर, गुलमोहर विहार, विवेकानंद नगर, निर्मल कॉलनी, काळे नगर, शंकर नगर, चित्रांगन सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर या भागात पाणीपुरवठा होणार नाही. प्रभाग क्र. 10 मध्ये अशोक नगर, जाधव संकुल, समृद्धी नगर, वास्तु नगर, विवेकानंद नगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजी नगर, राधाकृष्ण नगर व इतर परिसर. प्रभाग क्र 11 मध्ये प्रबुद्ध नगर व इतर परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
नाशिक पश्चिम विभागातही पाणी नाही
नाशिक पश्चिम विभागात प्रभाग क्र. 7 मध्ये नरसिंह नगर, पुर्णवाद नगर, अरिहंत हॉस्पिटल परिसर, दाते नगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा आनंद नगर, डि. के. नगर, शांती निकेतन सोसायटी परिसर, आयचित नगर परिसर, चैतन्य नगर परिसर, सहदेव नगर परिसर, पंपींग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिक नगर व इतर परिसर सावरकर नगर, दाते नगर, राम नगर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पिटल परिसर, जहान सर्कल परिसर. तर प्रभाग क्र. 12 मध्ये रामराज्य जलकुंभ परिसर, यशवंत कॉलनी, कल्पना नगर, डिसुझा कॉलनी, कॉलज रोड व इतर परिसर डिसुझा कॉलनी, शिवगीरी सोसायटी, कॉलेज रोड परिसर, एस.टी. कॉलनी परिसर, शहीद चौक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
आणखी वाचा
पाणी टंचाईचं भीषण वास्तव, नाशिकच्या गंगापूर धरणाच्या मधोमध उभं राहून आढावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
