एक्स्प्लोर

Nashik Water Storage : जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५५ टक्के जलसाठा शिल्लक; कोणत्या धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी

Nashik News : जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 55 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 27 टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची एकूण 24 धरणे आहेत.

Nashik Water Storage नाशिक : जिल्ह्यातील धरणांमध्ये (Dam) सध्या केवळ 55 टक्के उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 27 टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून एकूण 24 धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवण क्षमता 65 हजार 664 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

मागील वर्षी 18 जानेवारीला 53 हजार 843 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा 36 हजार 322 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच गतवर्षीपेक्षा 29 हजार 342 दशलक्ष घनफूट पाणी कमी आहे. यंदा 27 टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाल्याचे चित्र आहे. पुढील सात महिन्यांची भिस्त याच पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. 

जुलै 2024 अखेरपर्यंत पुरविण्याचे आव्हान

2023 साली सुरुवातीपासून मान्सूनमध्ये (Monsoon) पावसाचा जोर कमी राहिला होता. त्यामुळे बहुतांश धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरू शकलेली नाहीत. उपलब्ध पाण्याचा विनियोग होत असल्याने पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा किमान जुलै 2024 अखेरपर्यंत पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. 

गंगापूर धरणात 67 टक्के जलसाठा

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) गतवर्षी 83 टक्के उपयुक्त जलसाठा होता. यंदा 67 टक्के पाणी उपलब्ध आहे. तर करंजवण धरणात गतवर्षीच्या तुलनेत 30 टक्के पाणी कमी आहे. ओझरखेडमध्ये 39 टक्के, वाघाडमध्ये 34 टक्के, तिसगावमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 44 टक्के तर माणिकपुंजमध्ये 45 टक्के उपयुक्त जलसाठा कमी आहे. 

दारणा धरणात 53 टक्के जलसाठा

आळंदी धरणात मागील वर्षी 77 टक्के जलसाठा होता तो आता 67 टक्के इतका आहे. पालखेड धरणात 2023 साली 71 टक्के साठा होता तो यंदा 62 टक्के झाला आहे. दारणा धरणात 18 जानेवारी 2023 साली 74 टक्के जलसाठा होता. यंदा तो साठा 53 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. 

मुकणे, गिरणा, नांदूरमध्यमेश्वरचा जलसाठा पुढीलप्रमाणे

मुकणे धरणात मागील वर्षी 88 टक्के जलसाठा होता तो आता 57 टक्के झाला आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात 2023 साली 97 टक्के जलसाठा होता. यंदा हा साठा 95 टक्क्यांवर आहे. गिरणा धरणात मागील वर्षी एकूण 79 टक्के जलसाठा होता तो आता 42 टक्क्यांवर आला आहे. भोजापूर धरणात मागील 2023 साली 81 टक्के साठा होता तो आता 20 टक्केच शिल्लक आहे. 

इतर धरणांची आकडेवारी

दरम्यान, कश्यपी धरणात 96 टक्के, गौतमी गोदावरीमध्ये 80 टक्के, पालखेड धरणात 62 टक्के, पुणेगाव धरणात 59 टक्के, भावली धरणात 47 टक्के, वालदेवी धरणात 93 टक्के, कडवा धरणात 38 टक्के, चणकापूरमध्ये 96 टक्के, हरणबारीमध्ये 69 टक्के, केळझर 65 टक्के, नागसाक्या शून्य टक्के, पुनदमध्ये 94 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  मागील वर्षीच्या तुलनेत 27 टक्क्यांनी कमी जलसाठा उपलब्ध आहे.

आणखी वाचा

Uddhav Thackeray Kalaram Mandir Visit : उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन कधी घेणार? समोर आली मोठी माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget