एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! डमी उमेदवाराच्या माघारीसाठी किशोर दराडेंकडून जोरदार प्रयत्न, पोलीस ठाण्यातही राडा

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. मात्र दिवसभर नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला.

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल (दि. 08) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. मात्र काल दिवसभर नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचे दिसून आले.  शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांचे नामसाधर्म असणारे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे किशोर दराडे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने दुपारी अडीच वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयात गोंधळ सुरू होता. अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घ्यावी यासाठी दुपारपासून शिवसेना शिंदेगटाकडून (Shiv Sena Camp) डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यांवर दबाव टाकला जात होता.  

अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांचे शर्टचे बटन तोडून त्यांना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे आणि समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप दुसरे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी केला. हा राडा पोलिसांसमोरच समोरच सुरू असल्याने अखेर किशोर दराडे यांना संरक्षण देण्यासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) नेण्यात आले. 

अपक्ष उमेदवार किशोर दराडे पोलीस बंदोबस्तात घरी

तिथेही शिंदे गटाचे वरीष्ठ पदाधिकारी जाऊन पोहचले आणि किशोर दराडे यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकला. विवेक कोल्हेंचे समर्थक नाशिकरोड पोलीस ठाण्याबाहेर जमू लागल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. दरम्यानच्या काळात अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांच्या कुटूंबियांना नाशिक पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून घेत किशोर दराडे यांना कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आली. त्यांनतर पोलीस बंदोबस्तात रात्री साडेदहाच्या सुमारास घरी सोडण्यात आले. 

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नाही 

माघारीला अद्याप तीन दिवसांचा अवधी असतानाच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच माघारीनाट्य रंगल्यानं निवडणुकीत रंगत आलीय. विशेष म्हणजे आपले कपडे फाडल्याची जाहीर कबुली देऊन 8 तास पोलीस ठाण्यात थांबूनही किशोर दराडे यांनी पोलिसांत कुठलीच तक्रार दिली नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. पुढील दोन तीन दिवसांत काय घडामोडी घडतात? कोल्हे-दराडे वाद कुठपर्यंत जातो? अपक्ष उमेदवार किशोर दराडे पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने महायुतीत बिघाडी?

दरम्यान, शिंदे गटाकडून किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून धुळ्यातील महेंद्र भावसार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, महायुतीतील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विविध चर्चांना उधाण आले असून ही जागा शिवसेनेची असून अजित दादांच्या उमेदवाराला आपण माघार घेण्याची विनंती करू, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी व्यक्त केल्यानंतर विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र निवडणुकीसाठी अजित दादांच्या राष्ट्रवादी गटाकडून आपल्याला एबी फॉर्म देण्यात आल्यानंतर आपण आपली उमेदवारी दाखल केली आहे. माघारीबाबत अद्याप कुठलीही विनंती आपल्याला करण्यात आलेली नाही. याबाबत अजितदादांकडून जो आदेश येईल त्यानुसार पुढची दिशा ठरवू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत फूट पडल्याची देखील चर्चा या निमित्ताने होऊ लागली असून अशी कोणतीही फूट पडलेली नसून पक्षाचे वरिष्ठ नेते एकमेकांशी संवाद साधूनच याबाबत निर्णय घेत असल्याचे महेंद्र भावसार यांनी सांगितले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसेंची हॅटट्रिक हुकली, पालकमंत्री दादा भुसेंनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी; म्हणाले....

एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget