एक्स्प्लोर

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Nashik Teachers Constituency Election Result 2024 :  नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. प्राथमिक फेरीत 64 हजार 848 मतपत्रिका अपेक्षित होत्या. मात्र काही वेळा पूर्वी मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्या आढळल्याने मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाला होता. आता पुन्हा एकदा मतपेटीत दोन अधिक मतपत्रिका आढळल्या आहेत. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा आढळल्या जास्त मतपत्रिका 

मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Camp) पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. याआधी चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. आता पुन्हा दोन मतपत्रिका जास्त आढळल्याने मतमोजणी केंद्रावर पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे. सध्या पाच मतपत्रिका बाजूला काढून ठेवण्यात आल्या आहेत. या मतपत्रिकांचे नेमके करायचे काय? याबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे. 

शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाईची मागणी 

याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कारवाईची मागणी केली आहे. एबीपी माझाची संवाद साधताना सुधाकर बडगुजर यांनी म्हटले की, चोपडा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर 3 मत पत्रिका जास्त आढळल्या आहेत. मतमोजणी कक्षातील 22 नंबरच्या टेबलवर मोजण्यात आलेल्या टेबलवर मतपत्रिका जास्त आढळून आल्यात. मतपत्रिका जास्त कशा आल्यात? याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी. मटपेट्या सील करताना अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. त्यामुळे मतपत्रिका जास्त आल्यानं आम्हाला संशय आहे. ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत हे मतदान केंद्र येते त्याच्यावर कारवाई करा. मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का? याचा तपास करा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. 

चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने चौरंगी लढत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade), अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रमुख लढत आहे. आता या चौरंगी लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Embed widget