एक्स्प्लोर

Nashik News: ठाकरेंच्या शिवसेनेवर दुःखाचा डोंगर कोसळला, नाशिकमधील उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nashik News: मनमाड शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेले असतानाच एक दुःखद घटना घडली आहे.

Nashik News: मनमाड शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या (Manmad Nagar Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकारण तापलेले असतानाच एक दुःखद घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधील शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) उमेदवार नितीन वाघमारे (Nitin Waghmare) यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मनमाड परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नितीन वाघमारे हे प्रभागातील ओळखले जाणारे आणि सक्रिय कार्यकर्ते होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा अचानक झालेला मृत्यू पक्षासाठी मोठी पोकळी निर्माण करणारा ठरला आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधून त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा उत्साह, पक्षाचा प्रचार आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असतानाच घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे ठाकरे गटात दुःखाची छाया पसरली आहे. अनेक स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व नेत्यांनी वाघमारे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नितीन वाघमारे यांच्या निधनाने प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक कार्यक्रमावर काही अंशी परिणाम होणार आहे. 

Manmad Nagar Parishad Election: मनमाडला बहुरंगी लढत

दरम्यान, मनमाडमध्ये थेट नगराध्यक्षसह 33 नगरसेवक पदासाठी निवडणुकीचे माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 9 तर नगरसेवकांच्या 33 जागांसाठी तब्बल 215 उमेदवार रिंगणात आहे. नगराध्यक्षासह नगरसेवकांसाठी सर्व 16 प्रभागात बहरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. बदलती राजकीय परिस्थिती आणि तब्बल 9 वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळे तरुण वर्ग या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे निवडणूक अतिशय चुरस होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून गल्ली बोळात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. काही ठिकाणी मात्र माजी नगरसेवकांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.  

निवडणुकीत शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीने, सोबत उद्धब बाळसाहेब ठाकरे आणि अजित पवार राष्ट्रवादी स्वचळावर उतरले आहे. काँग्रेसने 9 जागांवर उमेदवार दिले असून शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, यांच्यासह इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहे. बहुरंगी लढतीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना, भाजप युतीचे बोगेश पाटील, उद्धब बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवीण नाईक, अजित पवार गटाचे रविंद्र घोडेस्वार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शुभम चुनियान, बंचित बहुजन आघाडीचे नितीन जाधव, बहुजन समाज पक्षाचे प्रवीण पगारे, अपक्ष राजू निरभवणे, अपक्ष निमदेव हिरे, यांच्यासह दोन अपक्ष निवडणूक लढवित आहे. 

आणखी वाचा 

Waman Mhatre Badlapur Nagarparishad: बदलापूरमध्ये शिंदे गटाकडून घराणेशाहीचा कळस, नगरपरिषदेसाठी एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Embed widget