एक्स्प्लोर

Nashik News: चांदवडला देवीचं दर्शन झालं, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं, सात महिन्याच्या मुलीसह आईचा बुडून मृत्यू

Nashik News: सिन्नर तालुक्यातील रामपूर परिसरात वीज कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात खडक ओझर परिसरात दोन्ही माय लेकींचा मृत्यू झाला आहे

नाशिक : देवीच्या दर्शनासाठी आलेल्या माय लेकींसोबत दुर्दैवी घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील केद्राई देवीच्या दर्शनानंतर धरणाच्या काठाजवळ असताना पाय घसरून पडल्याने सात महिन्याच्या चिमुरडीसह आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सनदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद वडनेरभैरव पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास वडनेरभैरव पोलिस करत आहेत.

नुकतीच सिन्नर तालुक्यातील रामपूर परिसरात वीज कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात खडक ओझर परिसरात दोन्ही माय लेकींचा मृत्यू झाला आहे. येथील केद्राई देवी मंदिर परिसरातील धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत वडनेरभैरव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चिमुकलीसह आईनेही जीव गमवला

चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील श्री केद्राई देवीच्या नवसपूर्तीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहूनगर येथील वडार समाजाचे नागरिक शुक्रवारी खडक ओझर येथील श्री केद्राई माता मंदिरात नवसपूर्तीसाठी आले होते. यावेळी ज्या सात महिन्यांच्या मुलीबाबत नवस होता, ती तन्वी नीलेश देवकर आणि तिची आई अर्चना नीलेश देवकर यांचे दर्शन झाले. याच सुमारास दोघी दर्शन झाल्यानंतर धरणाजवळ गेल्या होत्या. यावेळी आई अर्चना देवकर हिचा पाय घसरून मुलीसोबत धरणात बुडाली.  काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. 

कुटुंबावर शोककळा पसरली

दरम्यान पोहता येत नसल्याने त्या दोघी माय लेकींचा करुण अंत झाला आहे. दर्शनासाठी आलेल्या इतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच बघ्यांची गर्दीही मोठी झाल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांनी लागलीच घटनेची माहिती वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांना दिली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एकीकडे मुलीच्या निमित्ताने ते सगळे देवीच्या दर्शनासाठी चांदवडला आले होते. मात्र या दुर्दैवी घटनेत सात महिन्यांच्या चिमुकलीसह आईलाही जीव गमवावा लागला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Sangli News : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत, एकाला वाचवताना दुसराही बुडाला; सांगलीतील हृदयद्रावक घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतेय, दफनभूमी कोणाच्या मालकीची नाही; पालकांची उच्च न्यायालयात धाव
मुलाच्या दफविधीसाठी जागा मिळेना, मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप, अक्षय शिंदेच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याTop 70 At 7AM 27 Sept 2024एबीपी माझा मराठी हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 27 September 2024Raj Thackeray Vidarbh Duara : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ,  दोन दिवस अमरावतीतSanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतेय, दफनभूमी कोणाच्या मालकीची नाही; पालकांची उच्च न्यायालयात धाव
मुलाच्या दफविधीसाठी जागा मिळेना, मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप, अक्षय शिंदेच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
Embed widget