एक्स्प्लोर

Nashik Mahayuti Melava : 23 जानेवारीला ठाकरे गटाचे ज्या ठिकाणी अधिवेशन तेथेच आज नाशिकला महायुतीचा मेळावा; निवडणुकीच्या तयारीला वेग

Nashik News : सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रसीमध्ये महायुतीच्या मेळावा होत आहे. 23 जानेवारीला ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याच ठिकाणी महायुतीची बैठक होत आहे.

Nashik Mahayuti Melava नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. आज राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात महायुतीचे मेळावे (Mahayuti Meeting) आयोजित करण्यात आले आहेत. 

राज्यातील 25 मंत्र्यांसह 52 प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रसीमध्ये थोड्याच वेळात महायुतीच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. 23 जानेवारीला ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याच ठिकाणी महायुतीची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  शिवसेनेकडून दादा भुसे, भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

शिवसेना, भाजप, अजित पवार गटात बैठक

गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून त्यांच्यात मनोमिलन व्हावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. आम्ही सर्व एकत्र असल्याचे दाखवत विरोधकांना आपली ताकद दाखवण्याचादेखील या माध्यमातून प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.

कोणत्या नेत्यावर कुठली जबाबदारी जाणून घ्या

नागपूर : चित्रा वाघ (भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा), जयदीप कवाडे (रिपब्लिकन पक्ष कवाडे गट)
छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे (कॅबिनेटमंत्री)
गडचिरोली : सुबोध मोहिते (माजी केंद्रीयमंत्री)
अहमदनगर : राधाकृष्ण विखे-पाटील (कॅबिनेटमंत्री)
अकोला : प्रवीण दरेकर (गटनेते भाजप, विधान परिषद)
सोलापूर : चंद्रकांत पाटील (कॅबिनेटमंत्री)
अमरावती : बच्चू कडू (माजी मंत्री), अनिल बोंडे (खासदार), रवी राणा (आमदार)
पुणे : रामराजे नाईक-निंबाळकर (माजी सभापती, विधान परिषद), आमदार प्रसाद लाड (समन्वयक महायुती)
भंडारा : विजयकुमार गावित (कॅबिनेटमंत्री)
धुळे : गिरीश महाजन (कॅबिनेटमंत्री)
लातूर : संभाजी निलंगेकर-पाटील (माजी मंत्री)
धाराशिव : तानाजी सावंत (कॅबिनेटमंत्री)
परभणी : संजय बनसोडे (कॅबिनेटमंत्री)
पालघर : रवींद्र चव्हाण (कॅबिनेटमंत्री), हितेंद्र ठाकूर (अध्यक्ष- बहुजन विकास आघाडी)
सिंधुदुर्ग : आदिती तटकरे (कॅबिनेटमंत्री)
हिंगोली : अब्दुल सत्तार (कॅबिनेटमंत्री)
मुंबई : दीपक केसरकर (कॅबिनेटमंत्री), आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), राहुल शेवाळे (खासदार, शिंदे गट), अविनाश महातेकर (माजी मंत्री,
रिपाइं आठवले गट), सचिन खरात (रिपाइं खरात गट), सिद्धार्थ कासारे (रिपाइं आठवले गट)
कोल्हापूर : हसन मुश्रीफ (कॅबिनेटमंत्री)
बीड : धनंजय मुंडे (कॅबिनेटमंत्री), तानाजीराव शिंदे (शिवसंग्राम)
सातारा : शंभूराज देसाई (कॅबिनेटमंत्री)
ठाणे : श्रीकांत शिंदे (खासदार)
मुंबई उपनगर : आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), छगन भुजबळ (कॅबिनेटमंत्री), गजानन कीर्तीकर (खासदार), रामदास कदम (माजी मंत्री)
गोंदिया : धर्मरावबाबा अत्राम (कॅबिनेटमंत्री)
नंदुरबार : अनिल भाईदास पाटील (कॅबिनेटमंत्री)
वर्धा : दीपक सावंत (माजी मंत्री)
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेटमंत्री)
जालना : अतुल सावे (कॅबिनेटमंत्री)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget