एक्स्प्लोर

Nashik News : केंद्रीय मंत्री गावितांची कन्या किसान संपदा योजनेची लाभार्थी, 10 कोटींचे अनुदान, मंत्री गावित म्हणाले, मी तेव्हा... 

Nashik News : सुप्रिया गावित यांना योजनेतून 10 कोटी सबसिडी मिळाल्याच्या आरोपावर मंत्री विजय कुमार गावित यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नाशिक : केंद्राची फूड प्रोसेसिंगची ही योजना असून 2019 साली माझ्या कन्येने अर्ज भरला होता. मुलाखत झाल्यानंतर अनुदान मिळाले होते, त्याचा फक्त पहिला हफ्ता मिळाला असून अजून दहा कोटी रुपये मिळाले नाही, शिवाय त्यावेळी मी मंत्री देखील नव्हतो. तसेच या योजनेत पुढारी असो की कोणीही असो पात्र असल्यास लाभ मिळत असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिले आहे.  

मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी सुप्रिया गावित (Supriya Gavit) यांना केंद्रीय किसान योजनेअंतर्गत 10 कोटी सबसिडी (Subcidy) मिळाल्याचा आरोप करण्यात आलं आहे. यावरून चांगलाच वाद रंगला असून या प्रकरणी गावित यांनी स्पष्टीकरण दिले आहे. केंद्राची फूड प्रोसेसिंगची ही योजना असून 2019 साली माझ्या कन्येने अर्ज भरला होता, हे सगळं ओपन आहे. अर्ज भरल्यानंतर मुलाखत होते, हे ज्यावेळी झाले, तेव्हा मी मंत्री पण नव्हतो, हे कुणालाही भेटू शकते, त्यावेळी मेरिटवर माझ्या कन्येला हे मिळालं आहे. या योजनेचा पहिला हप्ता मिळाला असून, त्याच्यावर काम सुरू आहे. त्यांना अजून 10 कोटी रुपये मिळाले नाही. शासनाची योजना ही सर्वांसाठी असते, पुढारी असो की, नसो, योजना कुणीही असो, पात्र असल्यास त्याला मिळेल, असे ते म्हणाले. 

दरम्यान याच पार्श्वभूमीवर सरकारने Maharashtra Government) अनुदान द्यावे, नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशा मागण्या नेहमीच होतात आणि सरकार मदत करतेही. मात्र, सर्वांना त्याची खरंच गरज असते का? अनेकदा श्रीमंतांनाही त्याचा लाभ होतो. ज्यांना ही मदत नको आहे, त्यांना तो सरकारला परत करता यावा, यासाठीची तरतूद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच उदाहरण म्हणजे भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांना सोयाबीनच्या नुकसान भरपाईपोटी 37 हजार मिळाले होते. 'मला हे अर्थसाहाय्य नको, असे म्हणत ते अमरावतीच्या (Amravati) जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. परंतु अर्थसाहाय्य परत करण्याचा नियम नसल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर भारतीय यांनी लक्षवेधी मांडली. त्यावर नियमावली तयार करण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले होते. 

केंद्रीय मंत्री गवितांची कन्या योजनेची लाभार्थी

अजित पवार, भारतीय आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची मध्यंतरी एक बैठकही झाली. त्यानंतर नियम आणण्यावर आम्ही काम करत असल्याचे समोर आले होते. 'ती' रक्कम सहायता निधीला कोणत्याही प्रकारचे अर्थसाहाय्य सरकारला परत केल्यास ते मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची कल्पनाही समोर आली. त्या रकमेचा उपयोग गरजूंसाठी होत असल्याचे बघून अर्थसाहाय्य परत करण्यास प्रोत्साहनच मिळणार आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावीत यांची कन्या सुप्रिया गावित यांच्या व्हॅली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कंपनीला केंद्राच्या किसान संपदा योजनेअंतर्गत 10 कोटींचे अनुदान मिळाले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी द्वीट करत ही बाब समोर आणली. एका मंत्र्याची मुलगी शासकीय योजनेची लाभार्थी कशी, असा सवाल उपस्थित करत सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच 'राईट टू गिव्ह इट अप' ही पर्यायी व्यवस्था अमलात आणणार आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Vijaykumar Gavit : मासे खाल्ल्यानं डोळे सुंदर होतात आणि मुली पटतात : विजयकुमार गावित 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्तTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget