Nashik News : पीक विमा योजना समजून घ्या, ही एक प्रक्रिया असते... पालकमंत्री दादा भुसे यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
Nashik Dada Bhuse : पीक विमा योजेनसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नाशिक : पीक विमा योजनेच्या (Pik Vima yojna) प्रक्रियेनुसार सर्व गोष्टी होतात. पहिला ट्रिगर हा दोन पावसात 21 दिवसांचा खंड असायला पाहिजे. त्यात 25 टक्के रक्कम दिली जाते आणि नंतर शेवटी पीक पाहणीवेळी उर्वरित रक्कम दिली जाते. हा बीड (beed) पॅटर्न असून तो सर्व राज्यात लागू केला आहे. याची प्रक्रिया आणि प्रोसेस असते. विभागीय आयुक्तांनी शासन पातळीवर अहवाल दिला जातो, मग त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होते, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे काल अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्यावर होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधता पीक विमा योजनेबाबत माहिती घेतली. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सरकारकडून काही मदत मिळाली नसल्याचे सांगितले. यावर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर पत्रकार परिषदेत ताशेरे ओढले होते. यावर आज पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'एक रुपयात पीकविमा करणारे राज्य महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी निर्णय घेतला. दरम्यान पीक विमा योजेनच्या प्रक्रियेनुसार सर्व गोष्टी होतात. पहिला ट्रिगर हा दोन पावसात 21 दिवसांचा खंड असायला पाहिजे. त्यात 25 टक्के रक्कम दिली जाते आणि नंतर शेवटी पीक कंपनीवेळी उर्वरित रक्कम दिली जाते. हा बीड पॅटर्न असून तो सर्व राज्यात लागू केला आहे. याची प्रक्रिया आणि प्रोसेस असते. विभागीय आयुक्तांनी शासन पातळीवर अहवाल दिला जातो, असे भुसे यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आत्ता जेवढा वेळ दिला, त्याचा पन्नास टक्के वेळ त्यांनी द्यायला पाहिजे होता, असा सल्लाही भुसे यांनी दिला.
गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक येथील नाशिक (Nashik) जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी दादा भुसे यांनी तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गेल्या 3 दिवसापासून निसर्गाने कृपा केली असून मागील आठवड्यात टंचाईला सामोरे जाण्यासाठी बैठक घेतली होती. मात्र दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर जिल्ह्यातील धरण साठ्याबाबत आज सायंकाळी आढावा घेतला जाणार असल्याचे भुसे म्हणाले. तसेच शहरातील अनेक भागात खड्डे असल्याने वाहनधारकांची कसरत होते. यावर भुसे म्हणाले की, मागील काळात खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न केले जाईल. मागील काळात बुजविले होते, मात्र आता पुन्हा खड्डे दिसून येत असल्याने संबंधित ठिकाणांवर पालिका प्रशासन पुन्हा कारवाई करतील, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घ्या...
सर्वोत्कृष्ट गणेश मंडळासाठी राज्य शासनाने 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 6 लाख रुपये उपलब्ध करुन देऊन जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळास 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणाही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी केली. तसेच गणेशोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच गणेश मंडळांना कोणत्याही अडचणी येवू नये याकरीता जिल्हा प्रशासन सर्व उपाययोजना राबवित असून गणेश मंडळांनीही नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर राज्य शासनाने गणेश मंडळांसाठी आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा, त्याचबरोबर शासनाच्या लोाकोपयोगी योजनांवर आधारित देखावे, आरास करण्याचे आवाहन त्यांनी केले.