![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik News : नांदगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, नऊ जणांच्या टोळक्याने दोन घरे फोडली, कुटुंबाला मारहाण करत लाखोंचा मुद्देमाल पळवला!
Nashik News : नांदगाव तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास नऊ जणांच्या टोळक्याने दोन कुटुंबीयांना जबरी मारहाण करत लाखों रुपयांचा मुद्देमाल पळवल्याचा प्रकार घडला आहे.
![Nashik News : नांदगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, नऊ जणांच्या टोळक्याने दोन घरे फोडली, कुटुंबाला मारहाण करत लाखोंचा मुद्देमाल पळवला! Nashik Latest news Thieves beat family and stole lakhs of rupees an incident in Nandgaon Maharashtra news Nashik News : नांदगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, नऊ जणांच्या टोळक्याने दोन घरे फोडली, कुटुंबाला मारहाण करत लाखोंचा मुद्देमाल पळवला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/c8f945f9a2af0a7385fc96340a7507521697962215259738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात चोरी, दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटे ग्रामीण भागाला लक्ष्य करताना दिसत आहेत. अशातच नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे मध्यरात्रीच्या सुमारास नऊ जणांच्या टोळक्याने दोन कुटुंबीयांना जबरी मारहाण करत घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तब्बल 3 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी (Robbery) पळविल्याचे संबंधित कुटुंबाने सांगितले.
नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील जळगाव खुर्द येथे हा लुटीचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर जळगाव खुर्द भागातील कुटुंबीय चांगलेच धास्तावले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव खुर्द येथील अप्पा महारू सरोदे हे व त्यांचे कुटुंबीय घरी झोपलेले असतांना मध्यरात्री शेळ्या ओरडण्याचा आवाज आल्याने घराबाहेर आले असता तोंडाला रुमाल बांधलेले काही तरुण पुढे येत त्यांनी थेट गळ्याला चाकू लावत घरातील तीन जणांना बेदम मारहाण (Beaten) सुरू केली. अप्पा सरोदे यांची पत्नी चंद्रकला व सून हर्षदा या दोघा महिलांच्या गळ्यातील व कानातील सोन्या - चांदीचे दागिने काढून घेतले..व घराच्या आतमध्ये जात मुलगा अंकुश यास देखील बेदम मारहाण केली.
दरम्यान चोरटयांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत सोने - चांदी तसेच रोख रक्कम असा एकूण 2 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. व घरातील सर्वांना कोंडून घेत दुसऱ्या घराकडे या चोरट्यांनी मोर्चा वळवला. त्यानंतर दत्तात्रय सजन डोखे यांचे घरी जावुन त्यांच्या कुटबियांनाही मारहाण करुन चाकुचा धाक दाखवुन सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 91 हजार रुपयांचा ऐवज घेवुन गेले. दोन्ही कुटुंबियांतील सदस्यांना मारहाण करत एकूण 3 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी लंपास केला. या घटनेनंतर नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख आदींच्या पथकाने आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
डॉक्टरची अपहरण करणारी टोळी जेरबंद
नाशिकच्या निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील डॉक्टरचे 13 ऑक्टोबर रोजी अपहरण करून लूट करणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून, संशयित तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान तिघांमध्ये छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांत वाँटेड असलेला सराईत गुन्हेगार श्रावण पिंपळेचा समावेश आहे. 13ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास टाकळी विंचूर येथील डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे त्यांचे नांदूरमधमेश्वर येथील दवाखाना बंद करून कारमधून घरी जात असताना विंचूर एमआयडीसी पार्क परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तिघांनी त्यांची कार अडवून डोक्यास पिस्तुल लावून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवत येवल्याकडे नेले होते. त्यांना दमदाटी करून त्यांच्या खिशातील पैसे, एटीएम कार्ड्स, मोबाईल फोन काढून घेण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत संबंधित संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
इतर महत्वाची बातमी :
Ulhasnagar Robbery CCTV : 3 सेकंदात हातसाफ, महिलेच्या गळ्यातली चैन खेचून दुचाकीस्वार फरार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)