(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Ganesh Visarjan : एक दिवस, चार घटना, सात जणांचा मृत्यू; नाशिकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान सहा जण बुडाले, एकाचा अपघात
Nashik Ganesh Visarjan : नाशिक गणेश विसर्जनादरम्यान (Nashik Ganesh Visarjan) शहर परिसरात तब्बल सात जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) शहर परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकांना गालबोट लागल्याच्या घटना समोर आल्या. शहर परिसरात वेगवगेळ्या चार घटनांत सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोदावरी नदीत तिघेजण बुडाले, वालदेवी धरण परिसरात एकजण बुडाला, याच परिसरातील चेहेडी संगमावर दोघे मित्र बुडाले. शहरातील अंबड भागात गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरातील गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुका शांततेत पार पडल्या. मात्र गणेश विसर्जनादरम्यान (Nashik Ganesh Visarjan) शहर परिसरात तब्बल सात जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास गोदा घाटावर तीन गणेश भक्त बुडाले. त्यांचा शोध सकाळी लागला असून गोदावरी नदीत (Godawari River) तीन युवकांचे मृतदेह आढळले. तर आणखी एक गणेश भक्त बुडाल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे वडनेर दुमाला येथील वालदेवी नदीपात्रामध्ये एकजण गणपती विसर्जन दरम्यान पाण्यात बुडाला होता. त्यानंतर त्याला वाचण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. चेहडी येथील संगमेश्वर नदीपात्रात सिन्नर फाटा परिसरात राहणाऱ्या दोघांचा गणेश विसर्जन करत असताना बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा शोध घेऊन नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik civil Hospital) दाखल करण्यात आले. तर रात्री दहा वाजेच्या सुमारास अंबड परिसरात ट्रॅक्टरखाली सापडून सहा वर्षीय मुलाचा नाहक बळी गेला. असा एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिकमधील गणेश विसर्जन मिरवणूक ऐन रंगात आली असताना सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास गोदाकाठावर विसर्जन करण्यासाठी नाशिककरांची गर्दी झाली होती. याच वेळी विसर्जनासाठी आलेले तीन जण बुडाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र रात्री उशिरा शोधकार्य थांबून आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु केली तेव्हा तिघांचे मृतदेह आढळून आले. यात मुदूराम ओम प्रकाश, राहुल सत्यनारायण मोरया, सोहनकुमार भगवती प्रसाद सोनकर या तिघांची ओळख पटली असून हे तिघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. तर दुसरी घटना चेहेडी संगमावर घडली आहे. चेहडी येथील संगमेश्वर नदीपात्रात सिन्नर फाटा परिसरात राहणाऱ्या दोघांचा गणेश विसर्जन करत असताना बुडून मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा त्याचा शोध घेऊन नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तर वालदेवी धरण (Waldevi Dam) परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ शोधमोहीम सुरु करण्यात आली. सदर युवकाला काही तासानंतर बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर अंबड परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असताना बापलेक ही मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. याचवेळी उतार रस्त्यावर ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत मिरवणुक पाहणाऱ्या गणेश भक्तांवर जाऊन ट्रक्टर धडकला. यात रुद्रा राजू भगत हा सहा वर्षीय मुलगा ठार झाला. तर त्याचे वडील राजू भगत हे जखमी झाले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी चार घटनांमध्ये सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरी एका युवकाचा शोध घेतला जात आहे.
इतर महत्वाची बातमी :