(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Tomato : कांदा पाठोपाठ टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत, टोमॅटो शेती प्लॅस्टिक व्हायरसच्या विळख्यात, काय आहे प्लॅस्टिक व्हायरस?
Nashik Tomato Farmers : नाशिक जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला टोमॅटोवर प्लॅस्टिक व्हायरसचा प्रादुर्भाव होत आहे.
नाशिक : कांदा पाठोपाठ नाशिक (Nashik) जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. टोमॅटोला भाव मिळत नाही. त्यातच रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उभी पिकं सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. स्थानिक बोली भाषेत शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक व्हायरस(Plastic Virus) असे रोगाला नाव दिले आहे. शेतकऱ्यांना धडकी भरविणारा हा प्लस्टिक व्हायरसमुळे शेतच्या शेत वाया जात असल्याने शेतकऱ्यावर नव संकट उभं ठाकल आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांद्याबरोबर (Onion Farmers) मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाचे (Tomato Crop) उत्पादन घेतले जाते. हळूहळू टोमॅटो पीक बाजारात येऊ लागले आहे. मात्र दुसरीकडे ज्यांचे टोमॅटो पीक ऐन भरात असताना प्लॅस्टिक व्हायरसचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिक जिल्ह्याच्या निफाड (Niphad) तालुक्यातील वडाळी गावातील लक्ष्मण झालटे हे गेल्या दोन अडीच महिन्यापासून तळ हातावरील फोडा प्रमाणे टोमॅटो पिकवला. दुष्काळी परिस्थितीत पाणी, औषधं फवारणी खतांची जमवाजमव केली, पीक वाढविले, मात्र 50 व्या दिवसापासूनच टोमॅटो पिवळा पडायला लागला आहे, टोमटो दाबला तरी तो दाबला जात नाही, एवढा कडक असून खेळण्यातील प्लस्टिकच्या टोमॅटोसारखा चमकत असल्याने शेतकऱ्यांनी त्याला प्लस्टिक व्हायरस नाव दिले आहे.
दरम्यान जिल्ह्यातील सर्वच भागात टोमॅटोची शेती केली जाते. लक्ष्मण झालटे यांनी एकरी दीड पावणे दोन लाख रुपये खर्च केला. मात्र हा सर्व खर्च वाया गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. टोमॅटो झाडांवरच पिवळा पडत असल्याने सगळं पीक शेतकऱ्यांनी सोडून दिले. जी झाडं हिरवी टवटवीत दिसत आहेत. त्याचेही टोमॅटो खराब (Tomato crop Damage) झाले असून विक्री होणार नसल्याने शेतकऱ्यांनी आशा सोडून दिली आहे. काही शेतकरी वातावरणातील बदलामुळे रोग पडल्याचे सांगत आहेत तर काही, भेसळयुक्त बियाणे (Fertilizers) मिळाल्याने पीक खराब झाल्याचा दावा करत असून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. एकदोन शेतकरी नाही तर वडाळी आणि आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनाही अशाच समस्येला सामोरं जावं लागत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
कृषी विभागाच्या पथकाने पिकांची पाहणी
दरम्यान शेतकरीच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या (Agri Department) पथकाने पिकांची पाहणी करत त्याचे पंचनामे केले असून 50/60 दिवस वाढलेली पीक खराब का होत आहेत, याचे शास्त्रीय कारण शोधलं जात आहे. बियाणे खराब, भेसळयुक्त असतील तर संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समोरील आस्मानी सुलतानी संकट थांबण्याच नाव घेत नाही. 13 दिवसानंतर कांद्याचे लिलाव सुरू झल्यानं कांद्या उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असताना टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे भाव नाही म्हणून लाल चिखल होतोय, तर दुसरीकडे झाडावरच टोमॅटो खराब होत असल्याने पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाच्या पाहणीत काय बाहेर येते आणि शेतकऱ्यांना काय दिलासा मिळतो याकडे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाची बातमी :
Tomato Plastic Virus : प्लास्टिक व्हायरसचा प्रादुर्भावामुळे नाशकात पिवळा आणि कडक टोमॅटो