एक्स्प्लोर

Nashik News : रात्रीची वेळ, ओव्हर स्पिडिंग जीवावर बेतणारं! नाशिक जिल्ह्यात सात महिन्यात 914 अपघात, 578 जणांचा मृत्यू 

Nashik News : राज्यातील अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून नाशिक (Nashik) आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यांच्या (Nashik) चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील अपघातांच्या (Maharashtra Accident) संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले असून देशात महाराष्ट्र (Maharashtra) पहिल्या दहामध्ये आहे. तर राज्यात नाशिकचा नंबर पहिल्या क्रमांकावर असून यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यात 914 अपघात (Road Accident) असून 578 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 441 जण जखमी झाले आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे अतिवेग नाशिककरांच्या जीवावर बेतत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 

नाशिकसह जिल्ह्यात दररोज अपघाताच्या (Nashik Accident) संख्येत लक्षणीय वाढ झाली असून यात दुचाकी अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रोजच अपघात होत असून याला ओव्हरस्पिडिंग कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या सर्वेक्षणांवरून समोर आले आहे. यानुसार दिवसेंदिवस अपघाती मृत्यूच्या (Accident Death) संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान महामार्ग पोलिसांनी याबाबत राज्यात होणाऱ्या अपघातांची आकडेवारी जाहीर केली असता 2021 या वर्षांत महाराष्ट्र अपघाताच्या संख्येत सहाव्या क्रमांकावर असून तब्बल 29 हजार 477 अपघात झाले आहेत. 13 हजार 528 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2022 मध्ये 33 हजार 383 अपघात झाले असून यात 15 हजार 224 मृत्यू झाले आहेत. तर राज्यात नाशिकचा नंबर पहिल्या क्रमांकावर असून यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यात 914 अपघात असून 578 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 441 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. 

अशी आहे आकडेवारी 

दरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Rural Police) हद्दीत सर्वाधिक अपघात असून 2021 मध्ये 1429 अपघातात 862 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2022 मध्ये 1462 अपघात 912 मृत्यू झाले आहेत. तर यंदा जानेवारीपासून ते जुलै पर्यंत 914 अपघात झाले असून 578 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी फक्त नाशिक ग्रामीण भागातली असून नाशिक शहर पोलीस (Nashik Police) हद्दीतील आकडेवारी देखील चिंताजनक आहे. नाशिक शहरात 2021 मध्ये 470 अपघातात 185 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2022 मध्ये 479 अपघात 207 मृत्यू झाले आहेत. तर यंदा जानेवारीपासून ते जुलै पर्यंत 288 अपघात झाले असून 122 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिसून आलं की ओव्हरस्पिडिंगमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

रात्रीची वेळ, मृत्यूची वेळ 

दरम्यान अपघातांवर योग्य उपाययोजना करून रस्ते अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्याच्या प्रयत्नात, महामार्ग पोलिसांनी सर्व अपघातांचे विश्लेषण केले आहे. यानुसार असे आढळून आले की सर्वाधिक अपघात मध्यरात्रीच्या दरम्यान झाले आहेत, संध्याकाळी 4 ते 8 ही रस्त्यांवरील वाहतुकीची सर्वाधिक वेळ असते आणि रस्त्यावर जास्त वाहने असतात, तर वास्तविक रॅश ड्रायव्हिंग रात्री 8 नंतर सुरू होते. रात्री 8 नंतर, रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होते, यामुळे अनेकजण ओव्हरस्पीडच्या नादात जीव गमावून बसतात. यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Accident Survey : नाशिककर जरा जपून! रात्री आठ ते बारा सर्वाधिक मृत्यूची वेळ, पोलिसांचे निरीक्षण 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Praful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget