Nashik Crime : तोंडात कापडाचा बोळा, हात -पाय बांधून नाल्यात फेकलं, पोलिसांना वेगळीच शंका! नाशिकच्या सिन्नरमध्ये काय घडलं?
Nashik News : सिन्नर (Sinner) तालुक्यातील पोलिसांनी घटनास्थळ गाठून जवळच असलेल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवरून तरुणाची ओळख पटवली.
नाशिक : नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली असून तालुक्यातील नांदूर शिंगोटे बायपास लगतच्या नाल्यांमध्ये तोंडात कापडाचा बोळा कोंबलेल्या व हात पाय बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा तरुण नाशिकच्या पंचवटी भागातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बाजूलाच असलेल्या बेवारस दुचाकीवरून मृत युवकाची ओळख पटवली असून या तरुणाचा घातपात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik Pune Highway) नांदूर शिंगोटे गाव बाहेरून जाणाऱ्या वावी रस्त्यावर बायपासलगत असलेल्या पुलाखालच्या नाल्यात पावसाचे पाणी साचले आहे आणि याच नाल्यात या तरुणाचा मृतदेह (Youth Death) आढळून आला आहे. परिसरात राहणाऱ्या उत्तम शेळके हे फेरफटका मारत असताना त्यांना ही बाब लक्षात आली. त्याचबरोबर बाजूलाच एक दुचाकी देखील आढळून आली. त्यांनी तत्काळ नांदूर शिंगोटे पोलिसांना (Sinner Police) घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दुचाकीच्या नंबर प्लेटवरून तरुणाची ओळख पटवली. हा तरुण नाशिकच्या पंचवटी परिसरातील लामखेडे मळ्यात राहणार असल्याचे समोर आले. गौरव नाईकवाडे असे या तरुणाचे नाव असून तो स्कुटी घेऊन रविवारपासून घरी आला नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.
गौरव हा पंचवटीतील (Panchavati) तारवालानगर येथील लामखेडे मळ्यातील रहिवासी होता. तो रविवारी दुपारी घरा बाहेर पडला, मात्र पुन्हा परतलाच नाही. त्याचा मोबाईल देखील दुपारनंतर बंद झाला होता. यामुळे त्याच्या येण्याची कुटुंबीय प्रतीक्षा करत होते, मात्र अचानक त्याचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली असता तरुणाचे हातपाय बांधून, तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी या घटनेचा खोलवर तपास करून उलगडा करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे गौरवने आत्महत्या केली की त्याच्यासोबत काही घातपात झाला आहे, याचा शोध आता ग्रामीण पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.
नाशिकसह ग्रामीण भागातील गुन्हेगारी वाढली
दरम्यान नाशिक शहरांसह ग्रामीण भागात देखील गुन्हेगारी वाढत असून सातत्याने हाणामारी, खून, अत्याचार, जमीनीचे वाद अशा घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे एकीकडे पोलीस एका प्रकरणाचा छडा लावत असताना लागलीच दुसरी घटना घडत असल्याने नाशिकची गुन्हेगारी पोलिसांच्या समोर मोठे आव्हान आव्हान आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूल ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर चांगला वाचक निर्माण करत असल्याचे चित्र आहे. सातत्याने होत असलेल्या धडक कारवायांमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे वास्तव आहे, यासाठी ग्रामीण पोलिसांनी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे दिसते आहे.
इतर महत्वाची बातमी :