(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Congress : नाशिकमध्ये जनसंवाद यात्रेनिमित्त आज काँग्रेसची सभा; बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती, काँग्रेसला उभारी
Nashik News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या (Congress) वतीने राज्यात भारत जोडोच्या धर्तीवर राज्यात जनसंवाद यात्रा काढली जात आहे.
नाशिक : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या (Maharashtra Congress) वतीने भारत जोडोच्या धर्तीवर राज्यात जनसंवाद यात्रा (Jansamvad Yatra) काढली जात असून, या यात्रेच्या निमित्ताने आज, बुधवारी नाशिकमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आणि खासदार इम्रान प्रतागढी उपस्थित राहणार शहरातील चौक मंडी परिसरात ही सभा होणार आहे.
भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेनंतर काँग्रेसकडून (Congress) आता जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. 03 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये काँग्रेसतर्फे जनसंवाद यात्रा यानिमित्ताने जनसंपर्क काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या जनसंवाद यात्रेमध्ये प्रत्येक ब्लॉक आणि तालुकास्तरावर जनसंवाद यात्रा काढून काँग्रेस कार्यकर्ते लोकांच्या भेटी घेऊन भाजप सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल जनजागृती करत आहे, याच निमित्ताने नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने 06 सप्टेंबर रोजी जुने नाशिक (Nashik) चौक मंडी येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या जाहीर सभेला महाराष्ट्राचे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी मार्गदर्शन करणार आहेत, असे माहिती नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट आकाश छाजेड यांनी दिली.
या जनसंवाद यात्रेनिमित्त होणाऱ्या जाहीर सभेमध्ये शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या जाहीर सभेला शहरातील सर्व काँग्रेस प्रेमी जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड आणि शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनिफ बशीर यांनी केले आहे. शहराध्यक्ष आकाश छाजेड म्हणाले की, देशात सरकारच्या दडपशाहीमुळे भितीचे वातावरण आहे. वाढती महागाई, महिलांवर अत्याचार, शेतीमालास भाव नाही, जातीय तेढ निर्माण करणे, विरोधकांचा आवाज दाबून लोकशाही- संविधान संपवण्याचे कटकारस्थान आदींमुळे जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी चीड आहे. जनतेच्या मनातील भिती दूर होण्यासाठी पक्षातर्फे राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रा सुरू झाली.
काँग्रेसची जनसंवाद यात्रा?
काँग्रेसकडून 03 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. यात 04, 05 सप्टेंबर : चंद्रपूर, 06 सप्टेंबर : गडचिरोली, 07, 08 सप्टेंबर : नागपूर, 09,10,11, 12 सप्टेंबर : भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जनसंवाद यात्रा असणार आहे. तसेच जनसंवाद यात्रेची वैशिष्टे म्हणजे भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही पदयात्रा काढली जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सहाही जिल्ह्यातील पदयात्रेत सहभागी होत आहेत. स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेत ही यात्रा फिरत आहे. यात्रेत पदाधिकारी व कार्यकर्ते लोकांशी संवाद साधत आहेत. प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात येणारे पत्रक घरोघरी पोहचविले जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील समस्या वेववेगळ्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रक जिल्हा स्तरावरही काढले जात आहे. .
इतर महत्वाची बातमी :
Congress Jan Samvad Yatra : वर्धा पदयात्रेतील थकलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची 'कार'मधून पदयात्रा