गौण खनिज उत्खननांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण आदेश, अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
Nashik latest news : ल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून वाळू सह गौण खनिज उत्खनन सुरूच असून यावर ठोस उपाय म्हणून आता थेट संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
Nashik Latest Marathi News Update: गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून वाळू सह गौण खनिज उत्खनन सुरूच असून यावर ठोस उपाय म्हणून आता थेट संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. ज्या ठिकाणाहून हे वाळू उपसा किंवा गौण खनिजांची चोरी करण्यात येईल त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात नदी पात्रातील वाळू ठिय्याचे अद्यापही लिलाव झाले नसले तरी मोठ्या प्रमाणावर चोरी छुप्या मार्गाने वाळू उपसा केली जात असल्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. त्याचबरोबर माती, मुरूम, दगड, खडी क्रशरचे उत्खनन केले जात आहे. त्याविरुद्ध कोणतेही कारवाई होत नसल्याचे आढळून आल्याने त्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक तहसीलदारांना आपापल्या भागात गौण खनिजाची वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करून रस्त्यावर तपासणी नाके उभारण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. या भागात अवैध उत्खनन अथवा वाहतूक केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत
नाशिक जिल्ह्यातील नदी नाल्यांमध्ये अजूनही मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे वाळू घाटांचे लिलाव करण्यात आलेले नाहीत. मात्र तरीही अनधिकृतपणे नद्यांमधून वाळूचा उपसा केला जात असल्याचे तक्रारी वाढत आहेत. एवढेच नव्हे तर लिलाव धरणांमधूनही वाळू काढली जात आहे. याशिवाय ग्रामीण भागातील डोंगर टेक.ड्यांचे उत्खनन केले जात असून त्याद्वारे मातीमुळे दगडांचा उपसा केला जात आहे. काही ठिकाणी अनधिकृत खडी क्रेशरच्या माध्यमातून उत्खनन केले जात आहे. परंतु एकही तालुक्यांमध्ये एकही कारवाई केली जात नसल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना त्यांनी कारवाईचा सूचना दिल्या आहेत.
दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत गौणखणीत उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी ज्या मार्गांनी गौण खनिजाची वाहतूक होते. असे मार्ग अधोरेखित करून अशा मार्गांवर आपले अधिकारी कर्मचाऱ्यांची 24 तास भरारी पथके स्थापन करून तपासणी नाके उभारावेत, तपासणी नाक्यांवर जाऊन खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची महाखानीच प्रणालीद्वारे तपासणी करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करावी अनधिकृत गौण खनिज वाहतूक करताना आढळून आलेले वाहन ज्या ठिकाणी उत्खनन करून भरण्यात आले, अशा ठिकाणांचा शोध घेऊन वाहन व त्यात सामील झालेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी तसेच त्याचा दैनंदिन तपासणी अहवाल सकाळी 10 वाजेपर्यंत सादर करावी असे सूचना देण्यात आले आहेत.
एमपीडीए अंतर्गत कारवाई
अवैध वाळूचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टी वाले गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींना आळा घालण्यासाठी शासनाने कायद्यात सुधारणा केली असून त्यात वाळू तस्करांचा समावेश आल्याने यापुढे वाळूचा वैद्य उत्खनन करणाऱ्या वाळू तस्करांविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करावी अशा सूचना करण्यात आले आहेत. मात्र जिल्ह्यात अशा प्रकारे एकही कारवाई करण्यात आली नसल्याकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.