नाशिक पदवीधरसाठी आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण, मतदारांना एक दिवसाची रजा
Nashik graduate constituency elections : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
Nashik graduate constituency elections : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी आज, सोमवारी (दि. 30) मतदान होत असून, प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, मतदारांसाठी एका दिवसाची नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली.
निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात
नाशिक पदवीधर मतदारसंघाची जिल्ह्यात निवडणूक आज, सोमवारी होत असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात असून, 2 लाख 62 हजार 721 मतदार आहेत. सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात आहेत. नगरमध्ये एक लाख 15 हजार 638 मतदार असून नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652 तर, जळगाव मध्ये 35 हजार 58, धुळे 23 हजार 412 आणि नंदूरबारमध्ये 18 हजार 971 मतदार आहेत. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ
मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोमवारी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे, याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ ही लिंक दिली आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान करता येणार आहे.
नाशिक विभागात 338 मतदान केंद्रे
नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक 147 मतदान केंद्रे अहमदनगर जिल्ह्यात आहेत. नाशिकमध्ये 99, जळगाव जिल्ह्यात 40, धुळ्यात 29 आणि नंदूरबार जिल्ह्यात 23 मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण 338 मतदान केंद्रे आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी सोमवारी मद्यविक्री करण्यास मनाई असून, कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे.
एकीकडे महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला असून दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियासह मतदारांशी जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे दुसरीकडे मतदारांची उदासीनता आणि उमेदवारांचा असलेला जोश नेमकी नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत काय रंग उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत काय रंग उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ही बातमी देखील वाचा